Drought Condition Agrowon
ताज्या बातम्या

Drought condition : सांगलीत गतवर्षीच्या तुलनेत ५० टक्क्यांनी पाऊस कमी

Rain decreased : सांगली जिल्ह्यात यंदा चार महिन्यांत ३१३.८ मिलिमीटर म्हणजे ६३.९ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा २७०.६ मिमी म्हणजे ४९.६८ टक्क्यांनी पाऊस कमी झाला

Team Agrowon

Sangli News : सांगली जिल्ह्यात यंदा पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पावसाची सरासरीही गाठली नाही. गतवर्षीच्या जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत ५८४.४ मिलिमीटर म्हणजेच ११३.५८ टक्के पाऊस झाला होता. यंदा चार महिन्यांत ३१३.८ मिलिमीटर म्हणजे ६३.९ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा २७०.६ मिमी म्हणजे ४९.६८ टक्क्यांनी पाऊस कमी झाला.

जिल्ह्यात गतवर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांची पावसाची सरासरी ५१४.५ आहे. गेल्यावर्षी या चार महिन्यांत ५८४.४ मिमी पाऊस झाला. अर्थात सरासरी पावसापेक्षा ६९.९ मिमी इतका पाऊस जास्त पडला. शिराळा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली होती. जिल्ह्यातील जत, खानापूर-विटा, तासगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ या दुष्काळ तालुक्यांतही सरासरी पावसापेक्षा अधिक पाऊस झाला होता. या दुष्काळी तालुक्यांत १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला होता. त्यामुळे खरीप हंगामातील पिके चांगली बहरली होती.

जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. त्याचबरोबर खरीप हंगामातील पिकेही वाया गेली. जिल्ह्यात यंदा जून ते २५ सप्टेंबरअखेर ३१३.८ मिमी म्हणजे ६३.९ टक्के पावसाची नोंद झाली. पलूस तालुक्याचा सरासरी पाऊस २६५ मिमी असून २८०.३ मिमी पाऊस झाला. अर्थात पलूस तालुक्यात सरासरीपेक्षा १५.३ मिमी पाऊस जास्त झाला. शिराळा तालुक्यात ९१ टक्के पाऊस झाला आहे. दुष्काळी पट्ट्यातील जत, खानापूर-विटा, तासगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ या पाच पावसाने दडी मारली आहे. कडेगाव तालुक्यात सर्वांत कमी पाऊस झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT