Weather Update  Agrowon
ताज्या बातम्या

Maharashtra Weather Update :मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज

राज्यात पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे. तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत.

टीम ॲग्रोवन

Pune Weather News : राज्यात पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका (Heat) आणि उकाडा वाढला आहे. तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळत (Rainfall) आहेत. आज (ता. ३) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता (Rain Forecast with Lightning) आहे. तर कोकण, विदर्भात मुख्यतः उघडीपीसह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीत आला. तो पंजाबच्या अमृतसरपासून, आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. छत्तीसगडपासून कोमोरिन भागापर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. दक्षिण भारतात पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांची स्थिती (शेअर झोन) आहे. तर उत्तर प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी ऊन सावल्यांचा खेळ पाहायला मिळत आहे. वाढत्या उन्हामुळे कमाल किमान तापमान आणि उकाड्यात वाढ झाली आहे. आज (ता. ३) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाचा, तर कोकण, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

विजांसह पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

मध्य महाराष्ट्र : नाशिक, जळगाव, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.

मराठवाडा : औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, नांदेड.

----

चौकट

राज्यात मंगळवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण :

सुधागडपाली ४०, माणगाव ३०, खालापूर ३०, खेड २०.

...

मध्य महाराष्ट्र :

गगणबावडा ३०, अक्कलकोट १०, लोणावळा १०.

....

मराठवाडा :उमरगा ३०.

.........

विदर्भ :

एटापल्ली १०, धारणी १०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tractor Sales Decline : सप्टेंबरमध्ये ट्रॅक्टरची विक्री घटली; एल निनोमुळे मागणीवर दबाव

Meat Quality Testing: मांस, पशुजन्य उत्पादन गुणवत्ता तपासणीची गरज

Agriculture Success Story: सामान्य शेतकरी ते प्रगतिशील, मार्गदर्शक शेतकरी

Vegetable Farming: भाजीपाला शेतीतूनच झाली मेथे कुटुंबाची उन्नती

Joyful Learning: आनंदाचा दिवस की आनंददायी शिक्षण

SCROLL FOR NEXT