Vegetable Farming: भाजीपाला शेतीतूनच झाली मेथे कुटुंबाची उन्नती
Profitable vegetable farming in India: नांदेड जिल्ह्यातील कापशी खुर्द (ता. लोहा) येथील दत्ता बालासाहेब मेथे यांच्या कुटुंबाने अनेक वर्षापासून भाजीपाला शेती टिकवली. ती चांगल्या प्रकारे जोपासली. यशस्वी केली. पारंपरिक पिकांऐवजी बाजारपेठांचा अभ्यास करून मागणीनुसार त्यांनी भाजीपाल्यांमधील पिके निवडली.