Monsoon Agrowon
ताज्या बातम्या

Monsoon 2023: राज्यात पाऊस कमीच राहणार; पण काही भागांना यलो अलर्ट !

Rain Update : हवामान विभागाने आजही काही भागांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त केली. तसेच काही जिल्ह्यांना आजही जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला.

Team Agrowon

Weather update : राज्याच्या बहुतांशी भागांमध्ये पावसाचा जोर कमी झाला. कालपासून सूर्यदर्शन होत आहे. तर सकाळपासून काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. पण पावसाचा जोर कमी होता. हवामान विभागाने आजही काही भागांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त केली. तसेच काही जिल्ह्यांना आजही जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला.

राज्याच्या काही भगाांमध्ये सलग दोन आठवडे हजेरी लावल्यानंतर पावसाचा जोर ओसरला. कालपासून राज्याच्या बहुतांशी भागात पावसाची उघडीप आहे. तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी होत आहेत. पण सर्वदूर असा पाऊस नाही. सध्या कोकण, घाटमाथ्यावरच राहून राहून पावसाच्या सरी पडत आहेत. मराठवाडा आणि विदर्भ, खानदेशात काही ठिकाणी हलक्या सरी झाल्या.

बंगाल उपसागराच्या उत्तरेकडे ठळक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. तसेच ९.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती ईशान्येकडे सरकण्याची शक्यता असून पुढील १२ तासांमध्ये कमी दाब क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाने आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवड्यातील काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला.कोकणातील रायगड आणि रत्नागिरी तर मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यांंमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला. तर मराठवड्यातील नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांनाही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर राज्यात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम सरी होतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yellow Pea Import: पिवळ्या वाटाण्यावर ३० टक्के आयात शुल्क

Banana Price Drop: सेलू तालुक्यात केळीदर ५०० रुपये प्रति क्विंटल

MGNREGA Benefit Limit: ‘मनरेगा’तील वैयक्‍तिक लाभांच्या योजनांसाठी दोन लाखांची मर्यादा

Rabi Crop Insurance: रब्बी पीकविमा नोंदणीचे काम सुरू

Maharashtra Weather Update: राज्यात विजांसह हलक्या पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT