Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Sangli Rain : सांगली जिल्ह्यात पाऊस थांबला

Latest Rain Update : वारणा धरणात २९.०१ टीएमसी पणीसाठा झाला आहे. वारणा धरणातून ५९६३ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत घट होऊ लागली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २.२ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. तर वारणा धरण क्षेत्रात २४ मिमी पावसाची नोंद झाली.

जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे. त्यातच वारणा आणि कृष्णा नद्यांच्या पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. त्यामुळे या दोन्ही नदी काठच्या गावांतील गावकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. वारणा धरणात २९.०१ टीएमसी पणीसाठा झाला आहे. वारणा धरणातून ५९६३ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

कोयना धरणात ७२.२२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरणातून १०५० क्युसेक तर अलमट्टी धरणातून ५७ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या आठवड्यात आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी १९ फुटांपर्यंत पोहोचली होती. त्यानंतर पाणी पातळी स्थिर होती.

पावसाचा जोर कमी होऊन नद्यांच्या पाण्याच्या पातळी हळूहळू कमी होऊ लागली आहे. भिलवडी येथील कृष्णा नदीची पाणी पातळी १४.४ फूट तर सांगली येथील आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी १३.०८ फूट आहे.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत झालेला तालुकानिहाय पाऊस (मिमीमध्ये) ः मिरज ः १.९, जत ः ०.७, खानापूर-विटा ः ०.५, वाळवा-इस्‍लामपूर ः १.८, तासगाव ः १.६, शिराळा ः १०.७, आटपाडी ः ०.१ कवठेमहांकाळ ः ०.८, पलूस ः २.५, कडेगाव ः १.३.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Industry: साखर उद्योगाला अल्प दिलासा

Maharashtra Land Revenue Code Section: कलम १५५च्या वापरावर निर्बंध

Kul Kayda Land Dispute: कुळकायद्याचा गैरवापर झाल्याचे उघड; महसूलमंत्री बावनकुळे यांच्याकडून तपासणीचे आदेश

Grape Vineyard Pruning: द्राक्ष बागांमध्ये छाटणीला वेग

Manoj Jarange Health Issue: मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली

SCROLL FOR NEXT