Maharashtra Rain Update : कोकण, मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस

Latest Rain Update Maharashtra : कोकण, मध्य महाराष्ट्रासह घाटमाथ्यावर पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. नद्यांची पाणी पातळी बऱ्यापैकी कमी झाली आहे.
Maharashtra Rain
Maharashtra Rain Agrowon

Pune News : कोकण, मध्य महाराष्ट्रासह घाटमाथ्यावर पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. नद्यांची पाणी पातळी बऱ्यापैकी कमी झाली आहे. धरणांत पाण्याची आवक कमी होऊ लागल्याने पाणीपातळी स्थिर होत आहे.

खानदेश, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडत असला तरी अनेक ठिकाणी उघडीप दिली आहे. शेतातील ओल कमी होऊ लागल्याने शेतीकांमाना वेग येऊ लागला आहे. मात्र, ज्या ठिकाणी अति पावसामुळे पिकांचे, जमिनीचे नुकसान झाले अशा ठिकाणी शेतकऱ्यांसमोर मोठ्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत.

ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्ह्यांत काही ठिकाणी मध्यम पाऊस पडला. अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. सिंधुदुर्गमधील येडगाव मंडळात ५५.३ मिलिमीटर पाऊस पडला. रत्नागिरीमधील सौंदळ मंडळात ४१.५, मार्गताम्हाणे ३८.३, गुहागर ३८.८, कुंभवडे ३६.८, कोंडगाव ३६ मिलिमीटर पाऊस पडला.

त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत घट झाली असून धरणांतील पाण्याच्या आवकेत मोठी घट झाली आहे. सध्या कोकणातील जवळपास सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. मागील काही दिवसांत मुसळधार झालेल्या पावसामुळे शेतात पाणी शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे.=

Maharashtra Rain
Maharashtra Rain Update : कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस

मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील वेल्हा येथे ८५ मिलिमीटर पाऊस पडला. तर माले ५०, आंबवडे, निगुडघर ५४.५ मिलिमीटर तर मुठे, भोलावडे, लोणावळा, पानशेत, आंबेगाव येथे हलका पाऊस पडला.

नाशिकमधील उंबरठाणा, सुरगाणा, इगतपुरी, धारगाव, नंदूरबारमधील मौलगी, वडफळी, सोलापूरातील निंबार्गी, दुधनी मंडळात चांगलाच शिडकावा झाला. साताऱ्यातील महाबळेश्‍वर येथे ६३.३, हेळवाक, मोरगिरी ५३.३ मिलिमीटर तर परळी, बामणोली येथे हलका पाऊस बरसला.

कोल्हापुरातील कडेगाव येथे ६५ मिलिमीटर तर काळे, बाजार भोगाव, करंजफेन,आंबा, गगनबावडा, साळवण, गवसे, चंदगड मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. इतर धुळे, जळगाव, नगर सह पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांच्या पूर्व भागात अधूनमधून शिडकावा झाला. तर अनेक भागात ढगाळ वातावरणाची स्थिती कायम होती. या भागात पेरण्या अजूनही पावसाअभावी पेरण्या खोळंबल्याची स्थिती कायम आहे.

Maharashtra Rain
Pune Rain Update : पावसाचा जोर ओसरल्याने धरणातील आवक घटली

मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील मंगरूळ मंडळात २०.८ मिलिमीटर पाऊस पडला. नांदेडमधील हदगाव येथे २२.५ मिलिमीटर पाऊस पडला. विदर्भातील यवतमाळमधील विडूळ मंडळात २०.५ मिलिमीटर, भंडाऱ्यातील आंधळगाव मंडळात २०.३ मिलिमीटर, गडचिरोलीमधील बामणी ३०, पेंटीपका ३५.५, एटापल्ली २६.५, मिलिमीटर तर सिरोंचा, गाट्टा येथे हलका पाऊस पडला.

गोंदियामधील तिरोडामधील मुंडीकोटा, वाडेगाव, ठाणेगाव, मोरगाव अर्जुनीमधील बोधगाव देवी, अर्जुनी, महागाव, केशोरी हलका पाऊस पडला. या भागात गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांची वाताहात झाली आहे. त्यामुळे दुबार पेरणीचा मोठा प्रश्न उपस्थित राहिला आहे.

राज्यात सोमवारी (ता. ३१) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला मंडळनिहाय पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - कृषी विभाग)

कोकण : ठाणे, मुंब्रा २०.३, धसइ, नयाहडी, सरळगाव २५, देहरी २०.५, किनहवळी, डोलखांब २१.८, उल्हासनगर, अंबरनाथ २२.५, कुमभर्ली २३.३, पोयनाड, चरी, रामराज २९.८, किहीम, सरल २६.८,

पवयंजे २१.८, मोराबे २१.८, नेरळ २८.३, आटोने २४, कसू २९.८, महाड २१.३, बिरवडी २९.३, नाटे २८.८, खारवली २९.३, तुडील २१.३, माणगाव २१.५, इंदापूर २०.३, लोणेरे २३, चानेरा २१.८, चिपळूण २१.३, खेर्डी ३०.८, रामपूर २५, वहाळ २४.५, सावर्डे २८.८, असुर्डे ३१.८, कळकवणे, शिरगांव ३०.८, दापोली २७.३, बुरोंडी २८.५, दाभोळ २१.८, वेळवी २७.३, शिर्शी २२.५,

आंबवली, कुळवंडी ३३.३, भरणे ३०, दाभीळ २२.५, धामणंद ३०.८, तळवली, पाटपन्हाळे २३.५, आबलोली २९, मंडणगड ३२, म्हाप्रळ २५.३, खेडशी २१.३, तरवल २२.८, पाली २३.८, कडवी २५.५, मुरडव २४.५, माखजन २२, फणसवणे २३.८, आंगवली ३२.५, देवळे २६.५, तुळसानी २१.५, तेर्ये २३.८, राजापूर २०.३,

कोंडये २५.३, ओणी २२, पाचल ३६, लांजा २८.३, भांबेड २०, पुनस २८.३, विलवडे २०, पेंडूर २१, श्रावण २५.८, पोइप २५.८, सावंतवाडी २१, वेंगुर्ला, वेतोरे ४३, कणकवली २७.३, फोंडा २३.८, नांदगाव २१, तळेरे २४.५, वागदे २७.३, कडावल ३१.५, माणगाव, पिंगुळी २१.३, वैभववाडी ३०.८, भुईबावडा ३०.८, तळकट २५.३, वसई, मांडवी, निर्मल, विरार, मानिकपूर २२.५, साइवन २३, कसा २५, तळवाडा २३.८.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com