Rain Agrowon
ताज्या बातम्या

Maharashtra Rains : कोकण, मध्य महाराष्ट्राला पावसाने झोडपले

Monsoon Update Maharashtra : गेल्या तीन दिवसांपासून कोकण आणि पूर्व विदर्भाला पावसाने झोडपले. गुरुवारी (ता. २०) सकाळपर्यंत रायगडमधील माथेरान येथे उच्चांकी ४०० मिलिमीटर तर, ताम्हिणी घाटात ३५० मिलिमीटर पाऊस पडला.

Team Agrowon

Pune News : गेल्या तीन दिवसांपासून कोकण आणि पूर्व विदर्भाला पावसाने झोडपले. गुरुवारी (ता. २०) सकाळपर्यंत रायगडमधील माथेरान येथे उच्चांकी ४०० मिलिमीटर तर, ताम्हिणी घाटात ३५० मिलिमीटर पाऊस पडला.

या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहे. तसेच रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. तसेच मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, खानदेशात पावसाचा जोर कमी असल्याने शेतीकामांना पुन्हा सुरुवात झाली आहे.=

कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर या जिल्ह्यांत धुव्वाधार पाऊस पडला. पवयंजे येथे सर्वाधिक ३४१ मिलिमीटर पाऊस पडला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडला. यामुळे कोकणातील कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा, जगबुडी या नद्यांनी पाणी पातळी ओलांडली आहे.

त्यामुळे रोहा, कोलाड, गोवे, पुई, वाकण, खारगाव, घटाव, नागोठाणे, पाली, उन्हेरे, महाड, राजेवाडी, दासगाव, खारपाडा, रावे, दादर, गुळसुंदे, मोहपाडा, दूरशेत, खेड शहर, अलसुरे, चिचघर, प्रभुवाडी अशी काही गावे बाधित झाली आहेत.

तर उल्हास, गाढी, सूर्या, वाशिष्टी या नद्यांची पाणीपातळी इशारा पातळीपेक्षा कमी आहे. परंतु बाधित गावामध्ये शेतात पाणी गेल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी पुढे येत आहे. रायगडमधील इरशाळवाडी येथे दरड कोसळल्याने अनेक घरे मातीखाली दबली आहेत.

मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार :

मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. जळगाव, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. तर साताऱ्यातील महाबळेश्‍वर येथे ३१० मिलिमीटर पाऊस पडला असून पूर्व भागात पावसाने काहीशा तुरळक सरी पडल्या.

सांगली, कोल्हापूर, पुणे जिल्ह्याच्या पूर्व भाग आणि नाशिक, धुळे, नंदुरबार, सोलापूर, नगर पावसाच्या तुरळक सरी पडल्या. तर जळगाव जिल्ह्यात कमीअधिक स्वरूपात पाऊस होता. गुरुवारी दिवसभर या भागात उघडीप दिली होती. काही वेळा अधूनमधून ऊन पडत होते.

मराठवाड्यात तुरळक सरी :

मागील काही दिवस मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांना पावसाने चांगलेच झोपडले होते. परंतु आता या भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. सध्या मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशीव अशा सर्वच जिल्ह्यांत पावसाचा प्रभाव कमी झाला असून अनेक ठिकाणी चांगलीच उघडीप दिली आहे. परंतु मागील काही दिवस झालेल्या पावसामुळे पिके चांगलीच तरारली आहेत.

विदर्भात पावसाचा जोर ओसरला :

पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यांत मागील तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस कोसळला. आता अनेक भागात पावसाचा जोर कमी झाला असून चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला.

या पावसामुळे ओढे, नाले भरून वाहत असून या भागातील राखेचा बंधारा फुटल्याने अनेक शेतामध्ये पाणी शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, वाशीम, अकोला या जिल्हयात अनेक ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी बरसल्या असून काही ठिकाणी शिडकावा झाला.

घाटमाथ्यावर पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

दावडी ३२०, कोयना (नवजा) ३०७, डुंगरवाडी २९९, खोपोली २९८, अंबोणे २८०, लोणावळा टाटा २७३, लोणावळा २५३, कोयना पोपळी २३२, शिरगाव २३०, खांड २२३, भिरा १९६, शिरोटा १५६, भिवपुरी १९३.

२०० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडलेली ठिकाणे (स्त्रोत - कृषी विभाग)

दहिसर, अप्पर कल्याण, कुमभर्ली, बेलापूर, तलोजे २७३.५, उल्हासनगर, अंबरनाथ, गोरेगाव, बदलापूर २१४.३, पनवेल २५७.८, ओवले २६१.८, कर्नाळा २३९.८, मोराबी २३२, कर्जत २२४.८, नेरळ २५८, कळंब २३१.५, कशेले २३३.३, चौक २२४.८, वौशी २१२.५, जसइ २०७.५. पाली २०६, पेण २७३.५, हमरापूर, वाशी २०७.५, कामरली २१२.५, महाड २६८.८, बिरवडी २२१.८, करंजवडी २६४, नाटे २५४.५, तुडली २२०.८, पोलादपूर २८५.८, कोंडवी २६४, वाकण २४८.३, मेंढा २१२, दापोली, आंजर्ले, वेळवी २४७.५, आंबवली, कुळवंडी २१०.५, भरणे २५४, आंगवली २०२.५, वसई, मांडवी, निर्मल, विरार मानिकपूर २१७.३, डहाणू, मालयण २३२.८, वेल्हा २२१.८, हेळवाक, मोरगिरी २१९.५.

राज्यात मंडलनिहाय पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

कोकण विभाग ठाणे १६१.८, बलकुम १०३, भाइंदर १०९, मुंब्रा १६१.८, कल्याण १३८.५, टिटवाळा १६३, ठाकुरली १७६.३, नडगांव १२६.५ देहरी १०८, नयाहडी ११६, भिवंडी १०६.५, अप्पर भिवंडी १७६.३, पडघा १२६.५, खारबाव १०३, शहापूर, किनहवळी, वसींड, डोलखांब १००, अलिबाग, किहीम, सरल, चरी १९४, चौल, रामरज, पोयनड १६२.३, कडाव १८५.५, खोपोली ११०.३, उरण १६३.८,

कापरोली, आटोने १८७.५, जांभूळपाडा १९५.८,कसू १६२.३, खारवली १५५.५, माणगाव, इंदापूर १२४.८, गोरेगाव, लोनेरे १६५.८, निझामपूर १५९.५, रोहा १७०.५, नागोठणे १५८.५, चानेरा ११०.३, कोलाड १८६.३, मुरूड १२०.५, नंदगाव १२१.५, बवरली १६२.३, श्रीवर्धन, वालवटी १४५.८, बोरलीपंचटण १४४.५, म्हसला, खामगाव १६९.५, तला १६०, चिपळूण, खेर्डी १७८.३,

मार्गताम्हाणे ११९.३, रामपूर १२८.५, वहाळ १४९.५, सावर्डे ११२.३, असुर्डे १३७, कळकवणे, शिरगांव १७३.५, बुरोंडी १४८, दाभोळ १००, वाकवली, पालगड, खेड ११४, शिर्शी १७८.५, दाभीळ, धामणंद १७८.५, गुहाघर ११३.८, तळवली, पाटपन्हाळे ११९.३, आबलोली १२९.८, हेदवी १४७.५. मंडणगड २३१.८, म्हाप्रळ १५६.८, देव्हारे १४२.३, मालगुंड १०३.८, टरवल ११६.८, कडवी १४४.३, मुरडव १६५.५,

माखजन १३९, फणसवणे १४७, कोंडगाव १७८.५, देवळे १४७.५, देवरुख १४५.३, तुळसानी १०८.३, तेर्ये १४७, सौंदळ ११९.३, पाचल ११२.८, लांजा १०६.८, भांबेड १२७.५, पुनस १०६.८, वैभववाडी, भुइबावडा १०३, येडगाव १५६.८, अगशी १६७.५, वाडा, कडूस, कोणे, कांचगड १०१.५, कसा १२६, चिंचणी १५६.३, पालघर, बायसर, तारापूर १५६.३, मनवर १०१.५, सफला, अगरवाडी १८७, तलसरी १०३, झरी १८८.

मध्य महाराष्ट्र : यावल, भालोद ९३.५, फैजपूर, बामणोद ११०.८, रावेर १३७.३, खिरोदा १७२, खानापूर १०४.८, सावदा १२७.३, खिर्डी १४१.३, निंभोरा ११७, ऐनपूर ११५.३, अंतुर्ली ११५.३, कुऱ्हा, घोडसगाव ८४.३, नांदगाव ९०.८, माले ११६, मुठे ७४.८, निगुडघर १०८, काले ९४.८, कार्ला १५१.५, खडकाळा ८५, लोणावळा १७९.३, बामणोली ११०, पाटण ९३, तापोळा, लामज १२६.५, बाजार भोगाव ९०.३, आंबा १७८.५, गगनबावडा १०३, साळवण १०६.३, चंदगड ८३.८.

विदर्भ : जळगाव २८.५, पी काळे ४१.३, माटरगाव ४३.५, मलकापूर ११०.८, दाताळा ८७, नरवेल ७०.५, धरणगाव ९३, जांभूळधाबा ८१, वडनेर ७६.५, चांदूरबिस्वा ८४.३, महाळुंगी ४६.५,गोंडपिंपरी १८०, धाबा ११८.८, जेवती ५५.८, पाटण ७२.५, ब्राह्मणी ६६.३, चामोर्शी ८८.३, आष्टी १६१.८, येनापूर ८८.३, सिरोंचा ७०, बामणी ११८, पेंटीपका ५२.५, असारळी ११७, अहेरी ६९.३, जिमलगट्टा १२९, अल्लापाल्ली ७२.८, पेरमिली १२०.३, कमलापूर ७३.३, धानोरा ६४, चाटेगाव ६६.३,

महत्त्वाचे...

- मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात वाढ

- गडचिरोलीत अनेक रस्ते बंद

- पुणे जिल्ह्यात दुर्गम भागातील शाळा बंद

- अतिवृष्टीमुळे बुलडाणा जिल्ह्यात ७५ हजार हेक्टरवरील पिके बाधित

- कोकणात अनेक गावांमध्ये पावसाचे पाणी शिरले

- भात शेतीला मोठा फटका

- राज्यातील अनेक भागात गुरुवारी पावसाची उघडीप

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Election Results 2024 : पोस्टल मतदानात कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून पहिला कल हाती

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

SCROLL FOR NEXT