Konkan Rain Update : कोकण, पूर्वविदर्भात पावसाचा धुमाकूळ

Konkan Monsoon Update: ताम्हिणी घाटमाथ्यावर ३३० मिलिमीटर; मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार
Heavy Rain
Heavy RainAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Heavy Rainfall in Konkan : पुणे : गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील सर्वच भागात पावसाचा जोर वाढला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर जिल्ह्यांत पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सावित्री, वाशिष्टी, अंबा अशा काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. धरणांतील पाणीसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे.

तसेच मध्य महाराष्ट्र, खानदेशात पावसाची संततधार सुरू असून काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. मराठवाड्यातही काही ठिकाणी अतिवृष्टी झाली असून विदर्भात जोर कायम आहे. या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

कोकणात धुमशान
कोकणात मंगळवार (ता. १८) पासून मुसळधार पाऊस सुरू आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर जिल्ह्यांच्या बहुतांश भागात वादळी वारे आणि संततधार सुरू आहे. किनारपट्टीच्या तालुक्यांत वादळी वारा आणि पावसाचा जोर अधिक आहे. संततधारेमुळे जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी पडझडीचे प्रकार घडले आहेत. या जिल्ह्याच्या बहुतांश भागात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील अनेक प्रमुख मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. पडझडीचे अनेक प्रकार घडले आहेत. बावळट-दाणोली (ता. सावंतवाडी) या मार्गावरील पाण्यात बुडालेल्या दोन गाड्यांमधील आठ पर्यटकांना वाचविण्यात यश आले. रत्नागिरीत मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले असून खेडची जगबुडी, चिपळूणात वाशिष्ठी नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी किनाऱ्यावरील लोकवस्तीत शिरल्यामुळे खेड, चिपळूणातील सुमारे दीडशेहून अधिक नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. ‘एनडीआरएफ’ची पथके नियुक्त केली असून पुराची शक्यता लक्षात घेत दोन्ही तालुक्यांतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Heavy Rain
Rain Update : पावसाचा धुमाकूळ सुरुच

मध्य महाराष्ट्रात संततधार :
खानदेशातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांत पावसाचा जोर कमी असला तरी अनेक ठिकाणी हलका पाऊस पडला. नगर, पुणे जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. विशेष म्हणजे घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळत आहेत. त्यामुळे नद्या, ओढे दुथडी भरून वाहू लागल्याने धरणांतील पाण्यामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. मागील दोन दिवसांत पुणे जिल्ह्यातील २६ धरणांमध्ये तब्बल ७.७० टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणसाठा ३६.६२ टीएमसीपर्यंत पोचल्याने पिण्याच्या पाण्याच्या काही प्रमाणात सुटण्यास मदत झाली आहे.

सांगली जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही अनेक भागांत हलका तर, काही भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. शिराळा तालुक्याच्या वारणा धरण क्षेत्रासह पूर्व भागात पावसाचा जोर वाढला. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू आहे. बुधवारी (ता. १९) दिवसभर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत पावसाची संततधार सुरूच राहिली. धरणक्षेत्रात पावसाचा जोर चांगला असल्याने धरणातील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ सुरू राहिली. बुधवारी दुपारपर्यंत एकूण २३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

Heavy Rain
Rain Update : खानदेशात पावसाचा धुमाकूळ

मराठवाड्याला दिलासा :
दोन दिवसापासून मराठवाड्यालाही पावसाने चांगलाच दिलासा दिला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशीव, या भागात पावसाचे प्रमाण कमी असले तरी परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली भागात पावसाने दमदार हजेरी लावली.

मराठवाड्यातील उमरी १२७.८, गोळेगाव १३३.५, हिंगोली १२०.३, नारसी १२२.३, दिग्रस ११९.५, खामबाला १२६.८, लिंबगाव १५३.५, सांगवी, बामनी १०७ मिलिमीटर पाऊस पडला. अशा काही मंडळात अतिवृष्टी झाल्याने नद्यांना चांगलेच पाणी आले आहे. काही ठिकाणी शेतामध्ये पाणी साचले होते. त्यामुळे खरिपात पेरणी केलेल्या पिकांना दिलासा मिळाला आहे. अनेक ठिकाणी हलका पाऊस पडला असून रखडलेल्या पेरण्यालाही वेग येणार आहे.

पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस :
विदर्भातील बहुतांश भागात पावसाचा जोर कायम आहे. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांतील बहुतांश मंडळात अतिवृष्टी झाली आहे. कुभा मंडळात सर्वाधिक १७७ मिलिमीटर पाऊस पडला. तर वातफली १०३.८, वनी, भालर ११३.४, शिरपूर, पुनावट १३६.५, सिंदोळा १०६, मारडी १४६.३, वनोजा १०४.५, बोतोनी मंडळात १४९ मिलिमीटर पाऊस पडला.

त्यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. या पावसामुळे धरणांतील पाणी पातळीत वेगाने वाढत आहे. तर पश्चिमेकडील अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशीम या जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण कमी असले तरी ढगाळ वातावरणासह पावसाची चांगलीच संततधार सुरू आहे. त्यामुळे अनेक शिवारात पाणी साचले होते. तसेच वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना आणि काही ठिकाणी सुकत असलेल्या पिकांना दिलासादायक हा पाऊस आहे.


या घाटमाथ्यावर पडला सर्वाधिक पाऊस ( मिलिमीटरमध्ये)
ताम्हिणी घाट ३३०, दावडी ३२४, डुंगरवाडी २९७, कोयना पोपळी २७३, खोपोली २६६, वळवण २१२, लोणावळा टाटा २०८, शिरगाव २१०, भिरा २०५, खांड १६०, शिरोटा १३४, भिवपुरी १३५.


दोनशे मिलिमीटरहून अधिक पाऊस पडलेली ठिकाणे :
कर्जत २६५.५, नेरळ २४४.३, काडव २३१.३, कशाळे २१८.३, चौक २६५.५, पोयंजे २४९.३, कोपरोली, जसाई २९४, पेण २०६.८, हमरापूर, वाशी २९४, तुडील २०३.३, पोलादपूर २२२, आंबवली २०४.८, महाड २०२, कळकावणे, शिरगाव २२७, घुगूस २११.


राज्यात मंडलनिहाय पडलेला पाऊस : (स्त्रोत ः कृषी विभाग)
कोकण : वसई, मांडवी, निर्मल, माणिकपूर १२१.८, विरार १७६.३, आगाशी १३५.३, कल्याण ११७.३, तितवाळा ११०.५, उल्हासनगर ११०.५, अंबरनाथ ११०.५, गोरेगाव ११६.३, कुंभारली ११६.३, गोरेगाव ११६.३, बदलापूर ११६.३, अलिबाग १६८, पोयनाड १६३, किहीम, सरल १२८.८, चरी १६८, चौल, रामराज १६३, पनवेल १५४.३, ओवाळे १०५.५, करनाळा १३६.८, मोराबे १५०.३, कळंब १९३, वावोशी १९४.८, खोपोली १०३, उरण १९३.८, पाली १४२.३, आटोने, जांभुळपाडा १७९, कसू १५७.३, कामरली १९४.८, बिरवडी १२४.८, करंजवाडी १७८, नाते १९१.५, खारवली १२४.८, मानगाव १०८.५, इंदापूर १२४.५, गोरेगाव १५६.५, लोणेरे १७१.८, कोलाद १०८.३, कोडवी १७८, वाकण १९६.३, बोरली १६३, श्रीवर्धन, वाळवटी १०५.५, खामगाव १२९.८, तळा ११३.८, मेढा १४६.८, चिपळून, खेर्डी १४७.५, मार्गातात्माणे १५३.८, रामपूर १४८.३, वावळ १२३.३, सावर्डे ११५.३, आसुर्डे ११९, दापोली १२४.८, आंजर्ला १२४.८, वाकवली १२१.३, पालगड ११७.८, वेळवी १२४.८, खेड १२१.३, शिरशी १३०.३, कुळवंडी १५३.८, भारणे १६९.३, दाभीळ १३०.३, धामनंद १४७.५, मंडनगड १०७.८, कडवाई १२०.५,मुरडव १०१.५, फनसावणे १०५.३, आंगवली १०१.३, तेरहे १०५.३, पाचल १०१.८, मालवण १२५.५, पेंडूर १५९, श्रावण १३२.८, अंबेरी १४३.५, पोयीप १३२.८, सावंतवाडी १६३.३, बांडा १४५.३, आंबोली १८५.८, मदुरा १६५.३, वेंगुर्ला १३७.३, शिरोडा १०५.३, म्हापण १५१, वेतोरे १७८.८, कणकवली १३३.५, सांगवे १३३.५, वगडे १३३.५, कुडाळ १३४, कडवळ १७२.३, कसाल १४६, वलवल १४२.८, मानगाव, पिंगुली १३२.८, वैभववाडी, बुईबावडा १०८.८ येडगाव १४५, तलवाट १८५.५, भेडशी १५४.३,

मध्य महाराष्ट्र : कुर्हा १०६.५, घोडसगाव ७१, बोदवड ७४.३, नांदगाव ६८३, मिरजगाव ४६, माही ६१, नान्नज ६०, नायगाव ५८, निघुडघर ५७.३, कार्ला ११४.३, लोणावळा १८२.५, वेल्हा १६५.३, पानशेत ५९.५, आंबेगाव ६५, मुतसी ७०, आगळगाव ७६.८, परळी ९७.३, बामनोळी ९१.८, पाटण ८४, हेलवाक १६८.८, महाबळेश्वर २५७.५, तापोळा, लामज ११७.३, बाजारबोगाव ७४.८, काले ५२.८, करंजफेन ६४.८, आंबा ७५.५, आवली ५८.५, गगनबावडा १०८.८, साळवण ८७.३, सांगरूळ ६२, शिरोळी दुमाला ५१.५, नेसरी ५०.५, पिंपळगाव ६५, कडगाव १८९.८, कराडवाडी ६६.३, आजरा ५६, गवासे १०८, चंदगड ७५.५, नारंगवाडी ६०.३, मानगाव ६६.३, कोवाड ६६.५, तुरकेवाडी ९५, हेरे ७५.८.

मराठवाडा : विरेगाव ६९.८, तळनी ५०.८, आष्टी ५१.८, कडा ६५.३, ताकलसिंघ ५७.३, जळकोट ५२.८, नळदुर्ग ६९, आंबी ५५, भूम ५८.३, वळवड ६७.८, येरमाळा ५४.५, डालींब ७२.८, मुलज ४३.८, मुरूम ६१.३, लेवळी ७२.८, वाशई ४९.८, पारगाव ४२.५, तेरखेडा ५३.५, नांदेड शहर ७६.५, तुप्पा ६४, वासारणी ६२.८, विष्णुपुरी ६९.८, वाजेगाव ६२, नाळेश्वर ८८.३, बिलोली ६४.३, कुडाळवंडी ६७.८, कुरूला ६०.३, मलकोली ७७, कापसी ५७.५, सोनखेड ८०.५, कळंबार ५८.३, मनथा ५४.३, भोकर ६०.५, मोघाली ९५.५, मातूल ६३.३, किनी ५३, इस्लापूर ५३.८, मुदखेड ७६, मुगूट ६५.३, बरड ७०.३, धर्माबाद ६२.५, कारखेली ९०.८, जरीकोट ७९.३, सिरजखोड ६२.५, सिंधी ७३.८, धानोरा ६६, अर्धापूर ७६.५, दाभीद ८७.३, मालेगाव ६९.८, मंजाराम ६२.३, पेडगाव ७२, झरी ६६, टाकळी कुंभाकरण ६६, जिंतूर ६५.३, आदगाव ७८, बोरी ६५, दुधाळगाव ६६, मोरेगाव ७०.५, मालहिवरा ८१.५, कळंमनुरी ६३, टेबुर्णी ७५.८, औढा, येहलगाव, सळना ७८, जावळा ७६.

विदर्भ : जळगाव ८३.३, वडशिगी ८०.५, सोनाळा ७४, भावबीर ७०.८, आसलगाव ९३, कौठाळ १०४.५, शेगाव १०२.३, मातरगाव ८९, जळंब ९२, जवळा १०२.३, मलकापूर १२५.८, धरणगाव १०४.५, निमगाव ७१.५, चांदूरबिसवा ८१, तेल्हारा ११६, मालेगाव बाजार १०७, आडगाव ८८.३, पाचगव्हाण ११६, कौलखेड ७१.८, मूर्तीजापूर ९३, हदगाव ८८, केनवाड ७५.८, चांदस ७५.८, मंगळूरपीर १३४.३, शेलू ७७.५, पोती ९६.३, पारडी ७७.५, मंगरूळचावला ९१.८, शिवानीरासूलापूर ७४.३, घुईखेड ७०.३, वरखेड ७१.८, मेतीखेडा ७५, रासा ७०.८, मारेगाव १०९.८, खडकडोह ८२, शिबला १००.८, करंजी १३७.५, रूंझा ९४.८, केळपूर ९३.३, धानोरा ११२, वाधोना १०८.८, किन्ही १०२.८, वडकी ९३.३, वर्ध ९४.८, कानडगाव १०४.३, पोहना ९३.३, अलीपूर ७८, वाडी ९६, कन्हान ९४.८, कमलेश्वर, ढापेवाडा ९८, कारगाव ८४.३, अडयाल ११८, चिचल ८८.३, बारवा १३४.५, भागडी ७८.३, चंद्रपूर १५०.८, पडोली ११७.५, वरोरा ९१.८, भद्रावती १२१, नांदोरी ९१.८, धोडपेठ १२१, राजुरा, विरूर स्टेशन ११७.५, बल्लारपूर १५०.८, चार्मोशी ११६.५, कुनपाडा ११७, आष्टी ९०..,स.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com