Rain Agrowon
ताज्या बातम्या

Rain : पूर्व विदर्भात जोर वाढणार

राज्यात विजांसह पावसाचा इशारा कायम

Team Agrowon

पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे सरकलेला मॉन्सूनचा आस, राज्यात असलेला कमी दाबाचा पट्टा या पोषक प्रणालीमुळे राज्यात विजा, मेघगर्जना, विजांसह पाऊस सुरू आहे. आज (ता. ११) पूर्व विदर्भासह, दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा ‘यलो अलर्ट’ (Yellow Alert) देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात विजांसह वादळी पावसाचा (Rain) इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रापासून महाराष्ट्र, तेलंगणा, दक्षिण छत्तीसगड, सीमांध्र ते उपसागरातील कमी दाब प्रणालीपर्यंत हा पट्टा सक्रिय आहे. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पूर्व-पश्चिम परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र कायम आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे. यातच उन्हाचा चटका, उकाडाही कायम असल्याचे चित्र आहे. आज (ता. ११) दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यांसह पूर्व विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाचा ‘यलो अलर्ट’ आहे.
..........
--चौकट--
ठळक कमी दाब क्षेत्र होणार तीव्र
पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र ठळक झाले आहे. आज (ता. ११) ही प्रणाली आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत. ही प्रणाली उत्तर आंध्र प्रदेश दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
...........
जोरदार पावसाचा इशारा ( यलो अलर्ट)
कोकण : रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
मध्य महाराष्ट्र : कोल्हापूर.
विदर्भ : वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
................
विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :
कोकण : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड.
मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर.
मराठवाडा : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड.
विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ.
...........

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

MIDC Long March : एमआयडीसीविरोधात वर्णे ते सातारा ‘लाँग मार्च’

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

SCROLL FOR NEXT