Rainfall Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ४५ मंडलांमध्ये पाऊस

परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ४५ मंडलांत शुक्रवारी (ता. १४) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला.

टीम ॲग्रोवन

हिंगोली ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील (Parbhani,Hingoli DIstrict) ४५ मंडलांत शुक्रवारी (ता. १४) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस (Heavy Rainfall) झाला. शुक्रवारी दुपारपर्यंत पाथरी तालुक्यासह काही भागात विजांच्या कडकडाट जोरदार पाऊस झाला.

परभणी जिल्ह्यातील ३० मंडलांत हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी, जिंतूर, पाथरी, पूर्णा तालुक्यांतील काही मंडलांत जोरदार पाऊस झाला. अनेक भागांत विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी २.४ मिमी, ऑक्टोबर महिन्यात सरासरी ५२.२ मिमी, तर १ जूनपासून आजवर एकूण सरासरी ७०२.६ मिमी पाऊस झाला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील २५ मंडलांत हलका ते जोरदार पाऊस झाला. हिंगोली, कळमनुरी, वसमत, सेनगाव तालुक्यांतील अनेक मंडलांत पावसाचा जोर होता. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ८.६ मिमी, ऑक्टोबर महिन्यात ११५.६४ मिमी, तर १ जूनपासून आजवर एकूण सरासरी १००१.४ मिमी पाऊस झाला आहे.

मंडलनिहाय पाऊस (मिमीमध्ये)

परभणी जिल्हा ः परभणी ग्रामीण ६.५, पिंगळी २१.८, जिंतूर ६.८, केकरजवळा ५.३, पाथरी १५.८, कासापुरी ९, पूर्णा ६.३, ताडकळस १४.८, कात्नेश्‍वर ५.

हिंगोली जिल्हा ः हिंगोली १२.५, नरसी नामदेव ९.३, सिरसम ३६.३, डिग्रस कऱ्हाळे ८, माळहिवरा १०, खंबाळा ७, डोंगरकडा ४१.५, वारंगा १९.३, हट्टा ६.५, येळेगाव ८, जवळा बाजार ८, सेनगाव ७.८, गोरेगाव २७.५, आजेगाव ६.८, साखरा ६.३, हत्ता १५.५.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT