Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : राज्यात काही भागांत पावसाचा अंदाज

राज्यात अनेक ठिकाणी हलका पाऊस होत आहे. आज काही मंडळांमध्ये मध्यम सरी पडल्या. मात्र पावसाचा जोर बहुतेक ठिकाणी कमीच होता.

टीम ॲग्रोवन

पुणेः राज्यात अनेक ठिकाणी हलका पाऊस (Rainfall) होत आहे. आज काही मंडळांमध्ये मध्यम सरी पडल्या. मात्र पावसाचा जोर (Rain Intensity) बहुतेक ठिकाणी कमीच होता. आज माॅन्सूनने परतीचा प्रवास (Monsoon Return Journey) केला नाही. तर हवामान विभागानं (Weather Department) उद्या सकाळपर्यंत कोकण आणि मराठवाड्यातील काही मंडळांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज (Heavy Rain Forecast) व्यक्त केलाय.

आठवडाभरापेक्षा अधिक काळापासून रखडलेला माॅन्सूनचा परतीचा प्रवास गुरुवारी सुरु झाला. संपूर्ण पंजाब, दिल्ली, चंडीगडसह वायव्य भारतातील बहुतांशी भागातून गुरुवारी मॉन्सून परतला. मात्र आज माॅन्सूनने पुन्हा मुक्काम केला. माॅन्सूनची सिमा जम्मू, उना, चंदीगड, कर्नाल, बागपत, दिल्ली, अल्वर, जोधपूर आणि नालीया या भागात कायम आहे.

आज कोकणात पावसाची उघडीप होती. काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. मात्र मोठ्या पावसाची नोंद झाली नाही. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार सरी पडल्या. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे पाऊस झाला. तर सुरगना आणि पेठ मंडळांमध्ये मध्यम ते हलक्या सरी पडल्या. धुळे जिल्ह्यातील शिरपूर आणि जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मंडळात पावसाने हजेरी लावली.

सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथे पाऊस झाला. तर नगर जिल्ह्यातील राहूरी, शेवगाव, चास, नेवासा आणि जामखडे मंडळांमध्ये हलक्या पावसाने हजेरी लावली. पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि वेल्हे येथे पाऊस झाला. पुणे शहर आणि परिसरातही काही काळा जोरदार सरी कोसळल्या.

मराठवाड्यातही ठिकठिकाणी पावसानं हजेरी लावली. औरंगाबाद, जालना आणि लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाच्या सरी पडल्या. तर उस्मानाबाद, बीड आणि नांदेड जिल्ह्यातही काही मंडळांमध्ये पावसानं हजेरी लावली.

विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा आणि गोंदीया जिल्ह्यातील सालेकसा येथे प्रत्येकी ३० मिलिमीटर पाऊस झाला. तसंच आमगाव, अर्जुनी मोरगाव आणि कोर्ची मंडळांमध्येही पाऊस झाला. या व्यतिरिक्त विदर्भात काही भागांमध्ये हलक्या सरी झाल्या.

हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत राज्यातील कोकण आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये विजांसह जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. तर राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील, असा अंदाज व्यक्त केलाय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maratha Youth Scheme: कर्जाचा व्याज परतावा तातडीने द्या : तांबे

Farmer Cup 2026: फार्मर कप स्पर्धेत पुतळीच्या महिला समूहाचा सहभाग

HTBT Cotton Seeds: नागपुरात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Satara Rain News: पूर्वमोसमी पावसाचा साताऱ्याला मोठा फटका

Hingoli Water Scarcity: पाणीटंचाई निवारणार्थ २८ गावांमध्ये ३६ नवीन विंधन विहिरीना मंजुरी

SCROLL FOR NEXT