नागपूर : इंदूर येथील भारतीय सोयाबीन संशोधन संस्थेने (आयआयएसआर) (IISR) बदलत्या वातावरणात तग धरणारी आणि पाण्याचा ताण सहन करणारी सोयाबीनची एनआरसी १३६ (Soybean NRC 136) ही जात (Soybean Verity) विकसित केली आहे. मध्य प्रदेशात या जातीच्या प्रसाराला मान्यता मिळाली आहे.
तसेच पूर्व विभागातील काही राज्यांमध्ये येत्या खरीप हंगामात या जातीची लागवड होईल, अशी माहिती भारतीय सोयाबीन संशोधन संस्थेच्या संचालिका डॉ. नीता खांडेकर यांनी दिली.
मध्य प्रदेश सरकारने या नवीन जातीला मान्यता दिली असून पुढील खरीप हंगामापासून लागवड सुरू होईल. दहा वर्षांच्या संशोधनानंतर एनआरसी-१३६ ही जात विकसित करण्यात आली आहे.
मॉन्सूनच्या कालावधीत दीर्घकाळ खंडामध्ये ही जात तग धरते. मध्य प्रदेशात या जातीच्या प्रसारणास मान्यता मिळाली आहे. बिहार सरकारने पुढील हंगामासाठी या जातीचे बियाणे उपलब्ध होण्यासाठी मागणी नोंदविली आहे.
महाराष्ट्रात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये या जातीच्या चाचणी घेण्यात येत आहे. चाचण्यांचे हे दुसरे वर्ष असून तीन वर्षांच्या निष्कर्षानंतर महाराष्ट्रात या जातीच्या प्रसारणास मान्यता दिली जाणार आहे, अशी माहिती भारतीय सोयाबीन संशोधन संस्थेतील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. ज्ञानेशकुमार सातपुते यांनी दिली.
जातीची वैशिष्ट्ये ः
१) दाणे भरण्याच्या काळात पावसाचा २० ते २५ दिवसांचा खंड पडला तरी समाधानकारक वाढ.
२) १०२ दिवसांत तयार होते.
३) मूगबीन यलो मोझॅक रोग, पाने खाणाऱ्या अळीस मध्यम स्तरीय प्रतिकारक.
४) प्रति हेक्टरी १७ क्विंटल उत्पादन.
५) ओडिशा, छत्तीसगड, बिहार, झारखंड राज्यात पेरणीसाठी प्रसारित.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.