Weather Update |Mandous Cyclone  Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीच्या प्रभावामुळे राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण झाले आहे. ढगाळ हवामानामुळे राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे.

टीम ॲग्रोवन

Pune : बंगालच्या उपसागरातील वादळी (Mandous Cyclone) प्रणालीच्या प्रभावामुळे राज्यात वादळी पावसाला (Rainfall) पोषक वातावरण झाले आहे. ढगाळ हवामानामुळे (Cloudy Weather) राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. आज (ता.१३) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता (Rain Forecast) हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तरेकडील राज्यांमध्येही गारठा कमी - अधिक होत आहे. राजस्थानमधील चूरू येथे सोमवारी (ता. १२) देशाच्या सपाट भू-भागावरील सर्वांत नीचांकी ५.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात मात्र किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. निफाड आणि धुळ्यात पारा ११ अंशांवर पोचला आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान १६ ते २४ अंशांच्या दरम्यान होते.

उपसागरातील वादळी प्रणालीच्या प्रभावामुळे राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. आज (ता. १३) कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. पावसाळी वातावरण निवळताच पुढील दोन दिवसांत किमान तापमानात २ ते ४ अंशांची घट होण्याची शक्यता आहे.

अरबी समुद्रात आज कमी दाब क्षेत्र

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ निवळल्यानंतर केरळ आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. ही प्रणाली अरबी समुद्रात येताच आज (ता. १३) पुन्हा कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. ही प्रणाली पश्चिम दिशेकडे किनाऱ्यापासून दूर जाण्याची शक्यता आहे. दरम्यान दक्षिण अंदमान समुद्रात नव्याने चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याचा अंदाज आहे.

सोमवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३०.५ (२०.८), जळगाव ३१.५ (२१.९), धुळे ३२.० (११.०), कोल्हापूर २८.३ (२१.१), महाबळेश्वर २४.५(१६.६), नाशिक ३०.३ (१९.२), निफाड ३०.४ (११.०), सांगली २९.२ (२१.१), सातारा २८.३(२१.७), सोलापूर ३०.४ (२०.६), सांताक्रूझ ३२.५(२२.४), डहाणू ३०.१ (२३.३), रत्नागिरी ३३.३ (२४.०), औरंगाबाद ३०.० (१७.८), नांदेड २८.२ (२०.०), उस्मानाबाद - (१८.०), परभणी ३०.० (२२.०), अकोला ३१.८ (२१.४), अमरावती ३०.६ (१९.९), बुलडाणा ३०.० (२०.५), ब्रह्मपुरी ३२.६ (२०.६), चंद्रपूर ३१.२ (२१.०), गडचिरोली २९.६(१८.६), गोंदिया २६.८(१८.०), नागपूर २९.५ (२१.२), वर्धा २९.०(२१.५), यवतमाळ २५.० (२१.०).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parliament Monsoon Session 2026: संसदेच्या आवारात विरोधक- सत्ताधारी आमने- सामने, लोकसभा, राज्यसभेचे कामकाज सलग चौथ्या दिवशी ठप्प

Marathwada Rain: मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत हलका ते दमदार पाऊस

Okra Farming: भुसावळात प्रसिद्ध मयूरभाऊंची भेंडी

Desi Cucumber Seeds: अनेक वर्षांपासून जोपासलेले देशी काकडीचे बियाणे

Protest Movement: दगडाहून कठोर हे सरकार

SCROLL FOR NEXT