Weather Update : हवामान बदलामुळे पावसाची शक्यता

हवेचे दाब कमी होतील तिथे तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता निर्माण होईल. प्रामुख्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, संपूर्ण मराठवाडा व विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रात वातावरणबदल जाणवतील.
ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सर्वसाधारण पावसाची शक्यता : हवामान विभाग
ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सर्वसाधारण पावसाची शक्यता : हवामान विभाग
Published on
Updated on

डॉ. रामचंद्र साबळे
-------------------
तापमान वाढीमुळे (Heat Increasing) दक्षिण भारत व महाराष्ट्रावरील हवेचे दाब १००८ ते १०१० हेप्टापास्कल पर्यंत कमी होत आहेत. हवेचे दाब (Air Pressure) आठवडाभर तितकेच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आग्नेयेकडून व नैर्ऋत्येकडून समुद्रावरून येणारे वारे मोठ्या प्रमाणात बाष्प वाहून आणतील.

हवेचे दाब कमी होतील तिथे तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता निर्माण होईल. प्रामुख्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, संपूर्ण मराठवाडा व विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रात वातावरणबदल जाणवतील. बाष्पाचे प्रमाण वाढून ढगनिर्मिती होऊन पाऊस होईल. डिसेंबर महिना अतिथंडीचा महिना असूनही अशी विरुद्ध स्थिती पाहायला मिळेल. हे सर्व तापमान वाढ व त्या अनुषंगाने होणारे हवामान बदल यामुळे घडत आहेत.

वाऱ्याच्या वेगात वाढ होणे हे हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्यामुळे घडत आहे. त्यामुळे सांगली, सोलापूर जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग वाढण्याची शक्यता आहे. कमाल व किमान तापमानात होणारी वाढ हवेचे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण करण्यास कारणीभूत ठरत आहेत. हे सर्व उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यापेक्षा आग्नेयेकडून व नैर्ऋत्येकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे घडत आहे. सकाळच्या व दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत वाढ होईल. आकाश अंशतः ढगाळ राहील. थंडीचे प्रमाण कमी होईल. अशा प्रकारच्या हवामान बदलासह पावसाची शक्यता निर्माण होईल. त्यामुळे पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

-----------------
कोकण ः
उद्या (ता. १२) सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत १६ ते २४ मि.मी. पावसाची शक्यता आहे. रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यात हवामान कोरडे राहणे शक्य आहे. कमाल तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. ठाणे व पालघर जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात ८१ ते ८५ टक्के, रायगड जिल्ह्यात ७१ टक्के, पालघर व ठाणे जिल्ह्यात ५७ ते ६३ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता रायगड, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात ४० ते ५० टक्के तर ठाणे व पालघर जिल्ह्यात ३१ ते ३५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ किमी आणि दिशा ईशान्येकडून राहील.

उत्तर महाराष्ट्र ः
कमाल तापमान धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस , तर नाशिक जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नाशिक व जळगाव जिल्ह्यात ५६ ते ६१ टक्के, तर धुळे, नंदूरबार जिल्ह्यात ४५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता नाशिक व जळगाव जिल्ह्यात ३३ ते ३५ टक्के तर नंदूरबार व धुळे जिल्ह्यात २६ ते २९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते ९ किमी राहील. जळगाव जिल्ह्यात वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून, तर नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यात ईशान्येकडून राहील. हवामान थंड व कोरडे राहण्यामुळे कापूस वेचणीस हवामान अनुकूल राहील. कापसाची वेचणी सकाळी करावी.

मराठवाडा ः
उद्या (ता.१२) उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात ३३ ते ३६ मि.मी. तर नांदेड, बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यात ४१ ते ४६ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहण्यामुळे बंगालच्या उपसागरावरून मोठ्या प्रमाणात बाष्प आणले जाईल. वाऱ्याचा ताशी वेग उस्मानाबाद व बीड जिल्ह्यात १४ कि.मी., जालना जिल्ह्यात १३ कि.मी. तर लातूर, परभणी, नांदेड व हिंगोली जिल्ह्यात ६ ते १० कि.मी. राहील. कमाल तापमान उस्मानाबाद, नांदेड, बीड, हिंगोली जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस तर लातूर व जालना जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. औरंगाबाद जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नांदेड,
बीड, परभणी व जालना जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस तर हिंगोली जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात किमान तापमान १८ अंश सेल्सिअस आणि औरंगाबाद जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ८७ ते ९१ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४३ ते ५६ टक्के राहील.

ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सर्वसाधारण पावसाची शक्यता : हवामान विभाग
Weather Update : महाराष्ट्रात विजा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता | ॲग्रोवन

पश्चिम विदर्भ ः
उद्या (ता.१२) वाशीम जिल्ह्यात ३८ मि.मी. तर अमरावती, अकोला व बुलडाणा जिल्ह्यात १६ ते १९ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १० किमी साधारणच राहील. कमाल तापमान बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बुलडाणा जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस, वाशीम जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस तर अकोला व अमरावती जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता बुलडाणा व वाशीम जिल्ह्यात ७२ ते ८५ टक्के, तर अकोला व अमरावती जिल्ह्यात ६० ते ६८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यात ३६ ते ३९ टक्के इतकी राहील.

मध्य विदर्भ ः
उद्या (ता.१२) यवतमाळ जिल्ह्यात ३८ मि.मी., वर्धा जिल्ह्यात २६ मि.मी. तर नागपूर जिल्ह्यात १८ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा आग्नेय व ईशान्येकडून राहील. यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ कि.मी. राहील. कमाल तापमान यवतमाळ जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान यवतमाळ जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता यवतमाळ जिल्ह्यात ९१ टक्के, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यात ६६ ते ७४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ३९ ते ४७ टक्के राहील.

पूर्व विदर्भ ः
गडचिरोली जिल्ह्यात आज (ता.११) ५ मि.मी. व उद्या (ता.१२) १० मि.मी. पावसाची शक्यता आहे. भंडारा व गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यात उद्या (ता.१२) ७ ते १० मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून आणि ताशी वेग ३ ते ५ कि.मी. राहील. कमाल तापमान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात २१ ते २२ अंश सेल्सिअस, तर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९३ ते ९४ टक्के, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ७२ ते ७६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ४० ते ४६ टक्के राहील.

पश्चिम महाराष्ट्र ः
उद्या (ता.१२) सोलापूर जिल्ह्यात ३५ मि.मी. तर कोल्हापूर जिल्ह्यात २८ मि.मी. पावसाची शक्यता आहे. तसेच सांगली व पुणे जिल्ह्यात १७ मि.मी., सातारा व नगर जिल्ह्यात २२ ते २३ मि.मी. पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर व नगर जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, सातारा जिल्ह्यात २२ अंश, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सोलापूर जिल्ह्यात १८ कि.मी. तर सांगली जिल्ह्यात १७ कि.मी. राहील. वाऱ्याचा ताशी वेग कोल्हापूर, सातारा, पुणे व नगर जिल्ह्यात ९ ते ११ कि.मी. राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८३ ते ९१ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४० ते ५२ टक्के राहील.

---------------
कृषी सल्ला ः
- द्राक्ष पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रतिबंधात्मक फवारण्या घ्याव्यात.
- हरभरा पिकावरील घाटे अळीच्या नियंत्रणासाठी शेतात पक्षिथांबे उभारावेत. कामगंध सापळे लावावेत.
- तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी निमअर्काची फवारणी करावी.
- धान्य सुरक्षित स्थळी साठवावे.
..................

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com