Rain Update  Agrowon
ताज्या बातम्या

Maharashtra Rain Update : राज्याच्या विविध भागांत पावसाची हजेरी सुरूच

Latest Rain Update : राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. तर कोकण, घाटमाथ्यावर हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस कोसळत आहे.

Team Agrowon

Pune News : राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. तर कोकण, घाटमाथ्यावर हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस कोसळत आहे.

या पावसामुळे धरणांतील पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. शुक्रवारी (ता.२९) दुपारनंतर छत्रपती संभाजीनगर, नाशिक, सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह पुणे जिल्ह्यांत काही ठिकाणी पाऊस पडला.

कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस पडत आहे. मात्र, शुक्रवारी (ता.२९) सकाळी आठ वाजेपर्यंत ठाकूरवाडी, वाणगाव या घाटमाथ्यावर सर्वाधिक ७७ मिलिमीटर पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात हलका ते मध्यम पाऊस झाला. येडगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ४२ मिलिमीटर पाऊस झाला.

अनेक धरणांचा पाणीसाठा ९० टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. नगर जिल्ह्यातील मुळा धरणात ८६ टक्के, सीना धरणातही ५२ टक्के, निळवंडे धरणात ९८ टक्के पाणीसाठा झाला आहे. साताऱ्यातील वाई, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यांत काही ठिकाणी दमदार, महाबळेश्‍वर, पाटण तालुक्यांत हलका पाऊस झाला. सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडल्या. तर खानदेशात ढगाळ वातावरण कायम आहे. नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक सरी पडल्या.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, जालना व धाराशिव या पाचही जिल्ह्यांत शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाचा जोर कमीच राहिला. जालना जिल्ह्यातील वरुड बु मंडलात ७५.८ मिलिमीटर पाऊस झाला.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ८४ पैकी २७ मंडलांत १ ते ४२ मिलिमीटर पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील ६३ पैकी केवळ १७ मंडलांत हलका, तर एक-दोन मंडलांत दमदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यात सर्वच भागांत पाऊस होत आहे. विदर्भात पावसाचा जोर कमी झाला आहे. पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

livestock Vaccination: पशुवैद्यक महाविद्यालयातर्फे इटलापूर येथे पशुधनाचे लसीकरण

Mahareshim Abhiyan: हिंगोलीत महारेशीम अभियानात १२० शेतकऱ्यांची नोंदणी

Watermelon Disease Control: अवकाळीनंतर कलिंगडावर रोगांचा धोका! कसे करावे नियंत्रण?

Sugarcane Production Drops: ऊस पिकाच्या उत्पादनात मोठी घट

Krushi Kumbh Exhibition: ‘कृषी कुंभ’ प्रदर्शनाचे आयोजन नेटके,मात्र शासकीय यंत्रणांची उदासीनता

SCROLL FOR NEXT