Tomato Agrowon
ताज्या बातम्या

Tomato Price Pune : पुण्यात टोमॅटो दराने गाठला उच्चांक, क्रेटला २५०० रूपये भाव

Tomato Rate: सध्या टोमॅटोचा भाव वाढला असल्याने किलोला १०० ते १५० रूपये दर मिळत आहे. यामुळे काही अंशी टोमॅटो उत्पादक शेतकरी सुखावला आहे.

Team Agrowon

Tomato Market Price : सध्या टोमॅटोचा भाव वाढला असल्याने किलोला १०० ते १५० रूपये दर मिळत आहे. यामुळे काही अंशी टोमॅटो उत्पादक शेतकरी सुखावला आहे. दरम्यान पुण्यातील उपबाजारसमिती असलेल्या नारायणगाव येथे टोमॅटोच्या दराला उच्चांकी दर मिळाला आहे. चांगल्या प्रतिच्या टोमॅटोच्या २० किलोच्या एका क्रेटला दोन ते अडीच हजार रुपयांचा उच्चांकी दर ठरला.

दरम्यान हा भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले याचबरोबर शेतकर्‍यांनी बाजार समितीत टोमॅटो विक्रीस आणताना त्यांची वर्गवारी करावी यामुळे चांगल्या मालाला चढा भाव मिळू शकेल असे आवाहन बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. संजय काळे यांनी केले आहे.

दरम्यान मागच्या महिन्यात ८ लाख ६८ हजार ५५ कॅरेटची उपबाजार नारायणगाव येथे आवक झाली होती. यामध्ये २० किलोच्या टोमॅटो क्रेटचा भाव पाचशेच्या आसपास होता. यानंतर मागच्या १५ दिवसांत हा भाव वाढत गेला.

तो भाव आता २००० ते २५०० चा भाव मिळत आहे. जून महिन्याच्या शेवटी बाजार समितीमध्ये टोमॅटो विक्रीतून करोडो रुपयांची उलाढाल झाल्याचे सचिव रूपेश कवडे यांनी माहिती दिली.

संपूर्ण मे, तर जून महिन्याच्या सुरुवातीस उन्हामुळे मोठ्या प्रमाणात बाजार समितीत टोमॅटोची आवक झाली होती. तुलनेने मागणी कमी झाल्याने अतिशय कमी भावात टोमॅटो विकणे भाग पडले. काही शेतकर्‍यांनी टोमॅटो फेकून दिले होते. नंतर टोमॅटोची मागणी वाढून आवक कमी झाल्याने भाव वाढल्याचे व्यापारी सांगत आहेत.

शेतकर्‍यांनी सरसट्टा माल क्रेटमध्ये भरून न आणता प्रतवारी करून आणल्यास चांगले बाजारभाव मिळतील, अशी सूचना बाजार समितीचे संचालक माऊली खंडागळे व सारंग घोलप यांनी केली आहे.

दरम्यान याबाबत टोमॅटो सप्लायर शेतकऱ्याच्या माहितीनुसार, बाजार समितीत येणारे टोमॅटो हे राजकोट, भुज, इंदूर येथे जात आहेत. सद्य:स्थितीत टोमॅटोला चांगला दर मिळत आहे. हे दर महिनाभर तरी स्थिर राहतील.

शेतकर्‍यांनी टोमॅटो पिकावर योग्य फवारण्या व खते देऊन उच्च प्रतीचे उत्पादन बाजारात पाठविल्यास त्यांना चांगला दर मिळण्याची शक्यता व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT