Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : पीकविमा कंपनीविरोधात बुलडाण्यात ठिय्या आंदोलन

जलसमाधी आंदोलनामुळे पीकविम्यापोटी जिल्ह्यात १०३ कोटी रुपये मंजूर झाले. आता हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्या जात आहे.

टीम ॲग्रोवन

बुलडाणा : पीकविमा (Crop Insurance) कंपन्यांकडून तुटपुंजी भरपाई (Crop Damage Compensation) अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जात असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupakar) व कार्यकर्त्यांनी सोमवारी (ता. २८) शेतकऱ्यांसह जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालय गाठत ठिय्या आंदोलन सुरू केले. सायंकाळपर्यंत हे आंदोलन सुरू होते.

जलसमाधी आंदोलनामुळे पीकविम्यापोटी जिल्ह्यात १०३ कोटी रुपये मंजूर झाले. आता हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्या जात आहे. मात्र आजवर चार दिवसांत अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम तुटपुंजी असून ही शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करणारी असल्याचा आरोप तुपकरांनी केला आहे.

ही बाब शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर आज दुपारी १ वाजता शेतकरी व कार्यकर्त्यांसह जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी यांच्या कक्षात ठिय्या मांडला. ‘एआयसी विमा कंपनी’चे जिल्हा समन्वयक दिलीप लहाने यांना पीक विमा कमी जमा होत असल्याबाबत प्रश्‍नांचा भडिमार करण्यात आला.

या ठिकाणावरूनच वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली. दुपारी चार वाजेपर्यंत ठिय्या कायम होता. कुठलेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने कार्यालय परिसरात तणाव सदृश परिस्थिती तयार झाली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tiger Death : बरडकिन्हीमध्ये आढळला वाघाचा मृतदेह

Borewell Crackdown : बोअरवेल खोदण्यापूर्वीच प्रशासनाचा दणका

Adinath Sugar Factory : ‘आदिनाथ’ची ४५० कोटींची मालमत्ता १२२ कोटींना विकल्याचा आरोप

Panchnama Update : सोलापुरात ३५ टक्के दुष्काळी क्षेत्राचे पंचनामे पूर्ण

Ration Card e-KYC: रेशन कार्डधारकांच्या सवलतीवर गदा

SCROLL FOR NEXT