Team Agrowon
स्वतः करोडो रुपयांचा मलिदा खाऊन शेतकऱ्यांच्या खात्यात अत्यल्प रक्कम जमा करुन शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करणार्या विमा कंपन्यांना विरुद्ध रविकांत तूपकर आक्रमक झाले.
शेकडो कोटींचा अपहार करणार्या पिकविमा कंपन्यांविरोधात आक्रमक होत जिल्हा बुलडाणा कृषी अधीक्षक यांच्या कार्यालयात धडक देत ठिय्या तूपकर यांनी मांडला.
यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक संतोष डाबरे व AIC विमा कंपनीचे जिल्हा कॉर्डिनेटर दिलीप लहाने यांना चांगलेच धारेवर धरले.कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केलेला काळाबाजार उघडकीस आणला.
दुपारी १२ वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत केलेल्या आक्रमक आंदोलनामुळे अखेर AIC कंपनी नरमली व जिल्ह्यातील रिजेक्ट केलेल्या २५,००० शेतकऱ्यांचे क्लेम डिसाईड करण्याचे कंपनीने मान्य केले व तसे लेखी पत्र तुपकर यांनी दिले.
परंतु पिकविम्या पोटी तोकडी रक्कम मिळालेल्या शेतकऱ्यांना वस्तुनिष्ठ पंचनाम्याच्या आधारे भरीव रक्कम जमा करण्याची मागणी आक्रमकपणे लावून धरली.