Turmeric  Agrowon
ताज्या बातम्या

Turmeric Quality : विकिरण तंत्रज्ञानाव्दारे हळदीची गुणवत्ता टिकविण्यासाठी प्रकल्प

Turmeric Radiation Project : या करारानुसार विकिरण तंत्रज्ञानाचा वापर करून हळदीची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी आय रेडिएशन प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे.

Team Agrowon

Hingoli News : ‘‘जिल्ह्यातील वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हळद (हरिद्रा) संशोधन व प्रशिक्षण केंद्र व मुंबई येथील भाभा अणु संशोधन केंद्र यांच्यात शुक्रवारी (ता. २) मुंबई येथे सामंजस्य करार करण्यात आला.

या करारानुसार विकिरण तंत्रज्ञानाचा वापर करून हळदीची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी आय रेडिएशन प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे हळद निर्यातीस चालना मिळेल,’’ अशी माहिती हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष खासदार हेमंत पाटील यांनी दिली.

‘‘या प्रकल्पाचे लवकरच काम सुरु होईल. हळद निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरेल. या प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन १०० टन इतकी आहे. या तंत्रज्ञानाचा हळदीसोबतच इतर मसाले पिकांना देखील उपयोग होईल.

या वेळी ‘ब्रिट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रदीप मुखर्जी यांची प्रमुख उपस्थिती होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमीपूजन होईल,’’ असे पाटील म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crop Loan : वर्धा जिल्ह्यात दुष्काळाचा पीककर्ज वाटपालाही फटका: रब्बी हंगामासाठी ७,६४५ शेतकऱ्यांना १२१ कोटींचे कर्जवाटप

Sustainable Farming : खानदेशात मोठा कृषी बदल: रासायनिक तणनाशकांचा वापर ३० टक्क्यांनी घटला

Rabi Season : खरिपानंतर आता रब्बी हंगामालाही दुष्काळाचा मोठा फटका; पाण्याअभावी पेरण्या रखडल्याने बळीराजा चिंतेत!

Old Farm Pond Lining Approval : शेतकऱ्यांची मोठी मागणी: जुन्या शेततळ्यांचे अस्तरीकरण नव्याने करण्यासाठी अनुदानास मंजुरी द्या!

Tembhu Project : सांगलीच्या दुष्काळी पट्ट्याला मोठा दिलासा: 'ताकारी आणि म्हैसाळ' योजना सुरू, आता 'टेंभू'चे आवर्तन कधी?

SCROLL FOR NEXT