Soybean Productivity Agrowon
ताज्या बातम्या

Soybean Productivity : नगर जिल्ह्यात सोयाबीनची एकरी सव्वासहा क्विंटल उत्पादकता

Team Agrowon

नगर ः जिल्‍ह्यात यंदा परतीच्या पावसाने सोयाबीन उत्पादकतेला (Soybean Productivity) मोठा फटका बसला. जिल्ह्यात सोयाबीनची एकरी सरासरी सहा क्विंटल उत्पादकता झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जामखेड तालुक्यात सर्वांत कमी एकरी पावणेचार क्विंटल, तर पाथर्डीत सव्वाचार क्विंटल उत्पादकता झाल्याचे पीक कापणी प्रयोगातून समोर आले आहे.

जिल्ह्यात साधारणपणे दीड लाख हेक्टरपर्यंत सोयाबीनची पेरणी केली जाते. मात्र गेल्या काही वर्षांत नेमक्या काढणीच्या काळातच परतीचा पाऊस येत असल्याने नुकसान होत आहे.

यंदाही तीच परिस्थिती झाली. यंदा सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस जोरदार कोसळला. त्याचा फटका सोयाबीन उत्पादकांना बसला.

कृषी खात्याने यंदा २८४ पीक कापणी प्रयोग केले. त्यातून जिल्ह्यात सोयाबीनचे हेक्टरी सरासरी १५८८ किलो ९५१ ग्रॅम म्हणजे एकरी सव्वा सहा क्विंटल उत्पादकता निघाली.

राहाता व श्रीरामपूरमधील गावांना मात्र मोठा फटका बसला आहे. राहाता तालुक्यात हेक्टरी ४७३ किलो म्हणजे एकरी दोन क्विंटलची उत्पादकता निघाली आहे.

संगमनेर, अकोले, राहुरी, नगर तालुक्यांत चांगली उत्पादकता निघाले आहे. मात्र एकंदर विचार केला तर सोयाबीनचे एकरी चार ते पाच क्विंटलचे नुकसान झाले आहे.

मात्र अजूनही शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळालेली नाही. पीकविमा कंपनीकडूनही फारशी दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत.

एकरी उत्पादन (किलो) ः नगर ः ६०६, पारनेर ः ५६८, जामखेड ः ६९९, पाथर्डी ः ६१५, नेवासा ः ५५८, राहुरी ः ७९४, संगमनेर ः ११६०, अकोले ः ७५२, कोपरगाव ः ५५४, श्रीरामपूर ः ६९९, राहाता ः १८९.

गेल्या काही वर्षांपासून सतत परतीच्या पावसाने सोयाबीनचे मोठे नुकसान होत आहे. यंदा सात एकर सोयाबीन पावसामुळे पूर्णपणे वाया गेले. २० टक्केही सोयाबीन हाती आले नाही. त्यामुळे यंदा मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अजून मदत मिळालेली नाही.
- अतुल तांबे, शेतकरी, तांबेवाडी, ता. श्रीरामपूर, जि. नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT