Beetle Leaf Agrowon
ताज्या बातम्या

Beetle Leaf : खाऊच्या पानांच्या अस्थिर दराने उत्पादक संकटात

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Beetle Leaf Production सांगली ः तीन वर्षांनंतर बाजारपेठेत (Beetle Leaf Market) खाऊच्या पानांना (Beetle Leaf) चांगली मागणी होती. हंगाम चांगला साधला. मात्र सातत्याने दरात चढ-उतार होत असल्याने पान उत्पादक (Leaf Producer) संकटात सापडला आहे.

नागवेलींच्या पानांचा हंगाम संपत आला आहे. सध्या नव्या हंगामाची तयारी शेतकरी करू लागले आहेत. तर काही ठिकाणी पानमळ्यात वेल उतरणीचे काम सुरू झाले आहे.

यंदाचा हंगाम चांगला जाईल, अशी शक्यता पान उत्पादकांनी व्यक्त केली आहे.

सांगली जिल्ह्यातील मिरज पूर्व भाग हा पान मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. या भागातील खाऊची पाने पंढरपूर, सोलापूर, कोकण यांसह अन्य ठिकाणी विक्री होतात. गेल्या तीन वर्षांपूर्वी, अर्थात कोरोना काळात पानांच्या मागणीत मोठी घट झाली होती.

गतवर्षी अतिपावसामुळे मळ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले होते. परंतु गेल्या वर्षी पानमळ्यांना पोषक वातावरण असल्याने दर्जेदार पानांचे उत्पादन हाती आले.

बाजारपेठेत खाऊच्या पानांना मागणी असून उठावही होत होता. श्रावण, भाद्रपद या महिन्यांत पानांना चांगले दर मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

दरम्यान, गणपती, दसरा, दिवाळी या सणांत पानांना अधिक मागणी असते. त्यामुळे या दरम्यान पानांना दर चांगले मिळाले असल्याने शेतकऱ्यांना दोन पैसे शिल्लक राहिले. बाजारपेठेत मागणी असून देखील पानांच्या दरात चढ-उतार होत होता.

त्यामुळे शेतकऱ्यांना कमी अधिक दर हाती मिळाला. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक गणित काहीसे बिघडले असल्याचे पान उत्पादकांनी सांगितले.

नागवेलीच्या पानांचा हंगाम संपत आला आला आहे. जानेवारीपासून पानमळ्यात वेलींची उतरण करण्याचे काम शेतकऱ्यांनी सुरू केले आहे.

जानेवारी ते मार्च ही तीन महिने विश्रांती देऊन मार्चनंतर पुन्हा नवीन हंगाम धरण्याची तयारी शेतकरी करतात. एप्रिलपासून नवीन पानांची खुडणी सुरू होते.

कोरोनामुळे बाजारपेठा बंद असल्याने शेतकऱ्यांनी पानमळे काढून टाकले आहेत. परिणामी, क्षेत्रात घट झाली आहे. यामुळे यंदा पानांना चांगले दर मिळतील, अशी आशा पान उत्पादकांनी व्यक्त केली.

पानाचे दर (प्रतिडाग) (प्रतिडाग १२ हजार पाने)

कळीचे पान - १००० ते १५००

फाफडा पान - ५००० ते ६०००

गेल्या वर्षभरात खाऊच्या पानांना बाजारपेठेत चांगली मागणी राहिली. त्यामुळे दरही चांगले मिळाले. मात्र दरात सातत्याने चढ-उतार होत असल्याने काही प्रमाणात अडचणीही आल्या. एकंदर हंगाम चांगला राहिला.

- भाऊसो नागरगोजे, नरवाड, जि. सांगली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत नियमबाह्य सहभागाबाबत कारवाईसत्र

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

SCROLL FOR NEXT