
सांगली ः तीन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनाचा (Covid 19) परिणाम अजूनही खाऊच्या पानांच्या (Beetle Leaf Market) बाजारावर दिसून येत आहे. यामुळे पानमळ्यांच्या शेतीला (Beetle Leaf Farming) उतरती कळा लागली आहे. गेल्या तीन वर्षांत खाऊच्या पानांच्या दरात (Beetle Leaf Rate) वाढ झाली नाही.
यंदाच्या हंगामात अवघे दोन महिने दरात वाढ झाली, पण दर टिकले नाहीत. सातत्याने दरात घसरण होत असल्याने खाऊच्या पानांची लाली उतरलेलीच आहे. यामुळे पानमळे ठेवायचे की काढायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
सांगली जिल्ह्यातील मिरज पूर्व भाग हा पान मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. या भागातील खाऊची पाने सोलापूर, कोकणासह अन्य ठिकाणी विक्री होतात. नैसर्गिक संकटे आली तरी शेतकऱ्यांनी पानमळे टिकवले आहेत. पानमळ्यांच्या जोरावर इथल्या शेतकऱ्यांनी आर्थिक प्रगती केली.
दरम्यान गेल्या तीन वर्षांपूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि बाजारपेठा बंद झाल्या. त्यामुळे पानांची विक्री करता आली नाही. अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी जिद्दीने त्याची जोपासना करून पानमळे जगविले. दरम्यान बाजारपेठा सुरू झाल्या, परंतु मागणी कमी असल्याने दरात वाढ झाली नाही.
यंदा पानांना अपेक्षित दर मिळाला नाही. गणपती, दसरा, दिवाळी या सणात पानांना अधिक मागणी असते. त्यामुळे या दरम्यान पानांना दर चांगले राहतील, असा अंदाज होता. अर्थात दोन महिन्यांपूर्वी एका डागाला (१२ पाने) ४ हजार रुपये असा दर मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून असा दर मिळाला नव्हता. त्यामुळे या पुढेही असाच दर राहील, अशी शक्यता होती. मात्र प्रति डागास १०० ते २०० रुपयांनी दर कमी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हिरावला. मार्गशीर्ष महिन्यात पूजेसाठी पानाची मागणी वाढते. पण दराची स्थिती कशी राहील, याचा अंदाज आत्ताच बांधता येणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
- कळी एक डाग १००० रुपये
- फाफडा एक डाग २४०० रुपये
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.