Indian Agricultural : वाढत्या उत्पादन खर्चाचे काय?

वाढत्या खर्चामुळे या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी ज्वारीऐवजी हरभरा या बियाणांची पेरणी केली आहे.
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon
Published on
Updated on

Agriculture Production Cost शेतीतील उत्पादन (Agricultural Production) वाढविण्याच्या प्रयत्नात उत्पादन खर्च हळूहळू कसा वाढत चालला आहे, हे दिसून येत नाही. धोरणात्मक बाजूने या उत्पादन खर्चावर (शेती अवजारे, रासायनिक खते (Chemical Fertilizers), बियाणे (Seed), कीडनाशके (Pesticides), दळणवळणाची साधने, साठवण साधने, इत्यादी) नियंत्रण आणल्याशिवाय पर्याय नाही.

सर्वांत कमी खर्च असणारे ज्वारीचे उदाहरण घेतले तर काय दिसते. कोरडवाहू - माळरानात ज्वारीचे पीक चांगले येते. हेच उत्पादन वाढीसाठी संकरित ज्वारीचे बियाणे (Hybrid Jowar Seed) आणून पेरले तर आपल्याला पीक उत्पादन वाढत आहे असे दिसून येईल.

परंतु रासायनिक खते, बियाणे खर्च, औषधे फवारणी, काढणी, मळणी, वाहतूक, आणि साठवण असा खर्च वाढत आह. या वाढलेल्या खर्चाचे काय? या प्रश्नाकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे.

वाढत्या खर्चामुळे या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी ज्वारीऐवजी हरभरा या बियाणांची पेरणी केली आहे. बियाणे संकरित असल्याने ज्वारीचे धान्य (उत्पादन) वाढेल पण मिळालेला कडबा जनावरांच्या खाण्यायोग्य फारसा नसतो.

Indian Agriculture
खते, बियाणे, किटकनाशके वेळेवर मिळणे आवश्‍यक 

शिवाय ज्वारीचे ताट मोठे असणे, कडक-कठीण आणि बिना कसदार असल्याने ते जनावरे खाण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे ज्वारीचे धान्य जास्त हातात पडले तरी कडबा/वैरण वाया जातो.

हे लक्षात घेतले तर संकरित ज्वारीच्या पिकापासून शेतकऱ्यांना तोटाच होतो. अनेक शेतकरी सांगतात की गावरान ज्वारीला पर्याय नाही.

गावरान ज्वारीची भाकरी हीच खूप चवदार-कसदार असते, भाकरीबरोबर चटणी-कांदा असला तरी पोटभर जेवण होते. शिवाय कडबा/वैरणीचे ताट देखील जनावरे चवीने खातात. गावरान ज्वारीचे काहीच वाया जात नाही.

त्यामुळे कमी जास्त फरकाने संकरित बियाणे वापरामधून उत्पादन वाढविण्याची कल्पना आपण करतो, पण उत्पादन वाढविण्याच्या प्रयत्नात चोर पावलांनी उत्पादन खर्चच जास्त वाढून बसला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com