Land Record Agrowon
ताज्या बातम्या

सातबारा उताऱ्यावर खासगी वनाच्या नोंदी

आंबेगाव आणि खेड तालुक्यांतील आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवर सातबाराला परस्पर महाराष्ट्र सरकारच्या खासगी वन अशा नोंदी लागल्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

टीम ॲग्रोवन

मंचर : आंबेगाव आणि खेड तालुक्यांतील आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवर सातबाराला (Land Record) परस्पर महाराष्ट्र सरकारच्या खासगी वन (Private Forest) अशा नोंदी लागल्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांनी (Tribal farmer) संताप व्यक्त केला आहे.

आंबेगाव तालुक्यातील डोण, नानवडे, आहुपे आणि न्हावेड ही गावे ही अनुसूचित क्षेत्रात येत असून, तेथे केंद्र सरकारचा पेसा कायदा लागू आहे. या कायद्यातील कलम ४ एम आणि पेसा कायद्याचे नियम २३, २४, २५ नुसार जमिनींच्या बाबतीत सुनिश्‍चित करण्याचा अधिकार हा ग्रामसभेस देण्यात आला आहे. यामुळे हा विषय त्या त्या गावातील ग्रामसभेत ठेवून निर्णय घेण्यात यावेत, झालेला प्रकार हा संबंधित शेतकरी अथवा ग्रामसभा यांच्या निदर्शनास न आणता महसूल प्रशासनाने त्या नोंदी परस्पर केलेल्या असल्याने त्या रद्द करून आदिवासी शेतकऱ्यांची नावे लावून पूर्ववत करण्यात यावी.

खेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बाबतीतही खरपुडी या गावातील दोन गटांच्या बाबतीत असाच प्रकार घडला असल्याने परस्पर केलेले फेरफार रद्द करून सातबाराला आदिवासी शेतकऱ्यांची नावे दाखल करून दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करून महसूल व वन विभागाने मनमानी केल्याचा आरोप आदिवासी कृती समितीचे संस्थापक संचालक सीताराम जोशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Delay: मॉन्सूनच्या विलंबाने खरीप हंगामाला फटका

SMART Rooftop Solar Scheme: अवघ्या २५०० रुपयांत सौर प्रकल्प

Kharif Sowing: मराठवाड्यात खरीप पेरणी अद्याप रखडलेलीच

Jal Jeevan Mission: ‘जलजीवन’ ठप्प; ४०० कोटींची गरज

Crop Insurance Compensation: पीकविम्याची रक्कम दहा दिवसांत द्या; अन्यथा सरण आंदोलनाचा शेतकऱ्यांचा इशारा

SCROLL FOR NEXT