Vidhan Bhavan Agrowon
ताज्या बातम्या

Kharghar Accident : खारघर दुर्घटनाप्रकरणी कुणाला पाठीशी घालता? पृथ्वीराज चव्हाण यांचा स्थगन प्रस्तावाद्वारे सरकारला सवाल

Prithviraj Chavan : खारघर दुर्घटनाप्रकरणी कुणाला पाठीशी घालून नये, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात स्थगन प्रस्तावाद्वारे सरकारकडे केली.

Team Agrowon

Maharashtra Monsoon Session 2023 : खारघर दुर्घटनेच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या एक सदस्यीय आयोगाला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली. मात्र, या आयोगाच्या कार्यकक्षेवर कटाक्ष टाकला असता या दुर्घटनेला जबाबदार कोण आहे याची चौकशीच करण्याचे अधिकार नाहीत, यात कुणाला पाठीशी घालायचे आहे का, असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केला.

या प्रकरणी स्थगन प्रस्तावाची सूचना दिली होती. मात्र, अध्यक्षांनी ही सूचना फेटाळल्यानंतर त्यांनी विषय मांडला. या वेळी चव्हाण यांनी सरकारच्या हेतूवर जोरदार हल्लाबोल केला. ‘खारघर येथे आयोजित महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी लाखो लोक गोळा केले. त्यात काहींचे बळी गेले. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी एक सदस्यीय समिती नेमली होती. या समितीला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली. आयोगाला खरेच काम करायचे आहे का, सरकारने आयोजकांच्या दबावाला बळी पडून हा कार्यक्रम ठरविला का, याची चौकशी करण्याची गरज आहे. या आयोगाची कार्यकक्षा पाहिली तर लक्षात येते की, घटनेबाबतची माहिती घेऊन माहिती विषद करणे अशी कार्यकक्षा निश्चित केली आहे. मग प्रश्न असा येतो की, सरकारला ही घटना माहीत नाही का, स्थानिक समितीने काय मदत केली याची माहिती घ्या असेही आयोगाला कार्यकक्षेत नमूद केले आहे. मात्र, या दुर्घटनेत दोषी कोण हे मात्र, हा आयोग शोधणार नाही. मुळात आपल्या पक्षाच्या नेत्याच्या सोयीसाठी दुपारची वेळ ठरविली का, या प्रकरणात कोण दोषी आहे का, कोणी आदेश दिले याची चौकशी होणे गरजेचे आहे, असेही चव्हाण म्हणाले.

यावर विधानसभा अध्यक्षांनी याबाबत उद्या प्रश्न आहे, त्या वेळी बोला असे सूचित केले. सांस्कृतिक कार्यमंत्री स्थगन प्रस्ताव हा सभागृह काळात घडणाऱ्या घटनांवर असतो, असे सांगून चव्हाण यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, चव्हाण यांनी आयोगाला मुदतवाढ आता दिली आहे. त्यामुळे हा आताचाच विषय आहे, असे सांगितले. यावर मुनगंटीवार यांनी ‘तुम्ही मुख्यमंत्री असतानाच्या काळातील घटनांचाही माहिती देऊ.’ असे म्हणताच काँग्रेसचे सदस्य आक्रमक झाले. त्यांनी मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत ते धमकी देत असल्याचा आरोप केला.

बाळासाहेब थोरात यांनी मुनगंटीवार यांच्या उत्तरावर आक्षेप घेत ‘आमच्या या काळातील प्रकरणे तपासणार आहात, असे बोलता म्हणजे दम देता का, मंत्र्यांना समज द्यायला हवी, अशी मागणी केली.

‘त्यांना चहा आणि केक द्या’

प्रश्नोत्तराच्या तासाला बोलू न दिल्याने आक्रमक झालेल्या भास्कर जाधव यांनी अध्यक्षांचा निषेध केला. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टाई करत वातावरण हलकेफुलके केले. जाधव हे अध्यक्षांना भेटतात. जाधव तुमच्या दालनात आले की त्यांना चहा द्या, पण सोबत केकही खाऊ घाला, असे म्हणताच सभागृहात हशा पिकला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solar Cold Storage: शेतीमाल साठवणुकीसाठी सौर शीतगृह

Cotton Crop Loss: वेचणीला आलेला कापूस भिजला

Soybean Dryer : सोयाबीन वाळविण्यासाठी ड्रायर !

Kolhapur Sugarcane Price Protest: कोल्हापूर जिल्ह्यात ऊसदराच्या आंदोलनाला हिंसक वळण, ३ ट्रॅक्टर पेटवले

Organic Farming : सेंद्रिय प्रमाणित शेतीचा तयार केला आदर्श

SCROLL FOR NEXT