PM Narendra Modi | Nagpur Metro  Agrowon
ताज्या बातम्या

Narendra Modi : पंतप्रधानांना श्रुतिकाच्या कृषी संशोधनाची भुरळ

मेट्रो प्रवासात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही निवडक विद्यार्थी, संशोधकांशी संवाद साधला. त्यामध्ये अपघातामुळे आपली पीएचडी अर्ध्यावर सोडावी लागणाऱ्या श्रुतिका बागूल यांचाही समावेश होता.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur: मेट्रो प्रवासात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काही निवडक विद्यार्थी, संशोधकांशी संवाद साधला. त्यामध्ये अपघातामुळे आपली पीएचडी अर्ध्यावर सोडावी लागणाऱ्या श्रुतिका बागूल (Shrutika Bagul) यांचाही समावेश होता. आईच्या स्वप्नपूर्तीसाठी झटणाऱ्या श्रुतिका बागूल यांनी गाईच्या शेणावर संशोधनात्मक (Research On Cow Dung) कार्य चालविले आहे. भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर आणि आयआयएम नागपूरचे तीला याकामी सहकार्य आहे. तिच्या याच संशोधनात्मक कामाची दखल घेत तीला थेट पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.

नागपूरच्या रवींद्र नगरात राहणाऱ्या श्रुतिका बागूल यांचा संशोधन क्षेत्रातील प्रवास तरुणींसाठी रोल मॉडेल आहे. पुणे विद्यापीठातून जैव रसायनशास्त्र शाखेची पदव्युत्तर पदवी मिळाल्यानंतर एका संशोधन प्रकल्पात पीएचडीसाठी श्रुतिका यांची निवड झाली होती.

दोन राष्ट्रीय पुरस्कार तिला मिळाले होते. मात्र ज्या दिवशी थिसीस द्यायचे होते. त्याच्या आदल्या दिवशी डोक्यावर नारळाची फांदी पडून अपघात झाला. या अपघातामुळे त्यांचे पूर्ण आयुष्यच बदलले. पीएचडी तर सोडाच परंतु दहा वर्ष श्रुतिका यांना संशोधनापासून दूर राहावे लागले. उपचाराअंती बरे झाल्यानंतर त्यांनी पुन्हा संशोधनावर फोकस करण्याचा निर्णय घेतला.

कोंढाळीजवळ श्रुतिका यांच्या आई कालिंदी ढाकुलकर यांची विठूराया गोशाळा आहे. या ठिकाणी बहुतांश गौळाऊ जातीच्या गाईंचे संवर्धन होते. या गाईंचे शेण आणि गोमूत्र यावर संशोधन त्यांनी सुरु केले. भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटरचे माजी तज्ज्ञ डॉ. शरद पवार यांचे सहकार्य याकामी मिळाले. काही वनौषधींचा वापर करून तीने खास हर्बल मिश्रित खत तयार केले. हे दोन किलो खत दोन दिवस पाण्यात ठेवायचे आणि पिकांना द्यायचे. पिकाची वाढ, फूल अवस्थेत आणि तिसरी फळधारणा काळात त्याचे परिणाम साधत असल्याचे निष्कर्ष आहेत.

आंबा, लिंबूसाठी देखील अशाप्रकारचे जैविक खत तयार करण्याचे काम श्रुतिका यांनी सुरु केले आहे. भाऊ अमित ढाकूलकर, आयआयएम (इन्फ्रेड विंग) याचे देखील या प्रकल्पात सहकार्य असल्याचे त्यांनी सांगितले. सप्तरंग रिसर्च ॲण्ड ऑर्गेनिक प्रायव्हेट लिमिटेड हा स्टार्टअप त्यांनी उभारला आहे.

नियंत्रित वातावरणात केशरचे उत्पादनही त्या घेतात. कृषी क्षेत्रातील याच कार्याची दखल घेत श्रुतिका यांना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्यासाठी बोलाविण्यात आले. ‘झिरोमाईल ते खापरी’ असा मेट्रोप्रवास त्यांनी पंतप्रधानांसोबत केला. पंतप्रधानांनी देखील त्यांच्या कृषी क्षेत्रातील संशोधनाविषयी बारकाईने जाणून घेतले.

कृषिमालाची उत्पादकता वाढ हा उद्देश डोळ्यासमोर ठेवत संशोधनावर भर दिला आहे. मक्‍यापासून हिरव्या चाऱ्याची निर्मिती हा प्रकल्प सुरुवातीला उभारला. मात्र तो फेल गेला. आता हर्बल खत हे नवे संशोधन सुरु केले आहे. त्याचे सकारात्मक परिणामही समोर आले आहेत. या संशोधनाची दखल घेत थेट पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. ही उपलब्धी माझ्या संशोधनाला बळ देणारी आहे.

- श्रुतिका बागूल, जैविक शेती संशोधक, नागपूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PDCC Bank: अतिवृष्टीग्रस्तांसाठी पीडीसीसी बँकेची १ कोटी २६ लाखांची मदत

Sugarcane Cultivation : नांदेड विभागात एक लाख ८१ हजार हेक्टरवर उसाची लागवड

Flood Livestock Loss : वाहून गेलेल्या पशुधनाला बाजारभावाप्रमाणे मदत द्या

Farmer Protest: कर्जमाफीशिवाय मागे हटणार नाही; २८ ऑक्टोबरला राज्यातील शेतकरी-मजूरांचा नागपूरात मोर्चा, बच्चू कडूंचा एल्गार

Diwali Clay Diyas : परराज्यातील पणत्यांची बाजारपेठांमध्ये आवक

SCROLL FOR NEXT