Fardad Cotton  Agrowon
ताज्या बातम्या

Fardad Cotton : दरांवरील दबाव, बोंड अळीमुळे फरदड कापूस काढला

खानदेशात ऐनवेळी रब्बी पिकांची पेरणी; सद्यःस्थितीत केवळ एक क्विंटल उत्पादन शक्य

Team Agrowon

जळगाव ः खानदेशात कापूस दरांवर (Cotton Rate) सतत दबाव आहे. तसेच दरांबाबबत अनेक अफवाही आहेत. पिकात गुलाबी बोंड अळी (Pink BollWorm) देखील वाढली आहे. यामुळे खोडवा किंवा फरदड कापूस पीक शेतकऱ्यांनी काढण्यास सुरुवात केली आहे.

नोव्हेंबरच्या सुरुवातीला दर बऱ्यापैकी किंवा नऊ हजार रुपये प्रतिक्विंटलवर होते. परंतु नोव्हेंबरच्या मध्यानंतर दर सतत कमी झाले. सध्या किंवा मागील पाच ते सात दिवसांपासून दरात कमालीची घट दिसत असल्याने शेतकऱ्यांनी फरदड कापूस पीक काढायला सुरुवात केली आहे. काही शेतकऱ्यांनी दर चांगले मिळतील, यासाठी मका, गहू, बाजरी आदी पिके टाळून फरदड कापूस पीक तसेच ठेवले होते. परंतु दर हवे तसे नाहीत. मागील हंगामात काही शेतकऱ्यांच्या फरदड कापसालादेखील नऊ ते साडेनऊ हजार रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले होते. परंतु यंदा बाजार अस्थिर आहे. शिवाय मजुरी वाढली आहे.

सध्या २०० रुपये रोज, अशी मजुरी महिला सकाळी आठ ते तीन या दरम्यान कामासाठी घेत आहेत. कापूस पिकात गुलाबी बोंड अळीचा प्रकोप वाढल्याने वेचणीवर हवा तेवढा कापूस येत नाही. बोंडे व्यवस्थित उमलत नाहीत. त्यात कचरा, किडीही येतात. यामुळे कापसाचा दर्जाही घसरतो. बाजारात तेजी नसल्याने फरदड कापूस घेण्यासंबंधी खरेदीदार उत्साह दाखवित नाहीत. यात शेतकऱ्यांचे नुकसान होते. कारण फरदड कापूस पिकाचे एकरी फक्त एक क्विंटल उत्पादन सद्यःस्थितीत शक्य आहे. त्याला वेचणी व इतर बाबींची मजुरी लक्षात घेऊन किमान चार हजार रुपये खर्च आहे. यामुळे शेतकऱ्यांनी फरदड कापूस पीक घेणे टाळले आहे. ज्यांच्याकडे पाणी आहे, त्या शेतकऱ्यांनी गहू, बाजरीची पेरणी सुरू केली आहे. यामुळे गहू पेरणीदेखील खानदेशात अद्याप सुरूच आहे. काही शेतकरी लवकर येणाऱ्या मका वाणांची लागवड कापसाखालील क्षेत्र रिकामे करून करीत आहेत.

पूर्वहंगामी कापूस काढणी

जळगाव जिल्ह्यात पाच लाख ६६ हजार हेक्टरवर कापूस पीक होते. यात सुमारे सव्वालाख हेक्टरवर पूर्वहंगामी कापूस पिकाची लागवड झाली होती. पूर्वहंगामी कापसाखालील ९५ टक्के क्षेत्र पीक काढून रिकामे झाले आहे. तसेच कोरडवाहू कापूस पीकही काढून त्यात पाट किंवा इतर शेतकऱ्यांकडून पाणी घेऊन शेतकरी पिकांची लागवड करीत आहेत. धुळ्यातही पूर्वहंगामी कापसाखालील सुमारे १५ ते १८ हजार हेक्टर क्षेत्र रिकामे झाले आहे. नंदुरबारातही सुमारे २० ते २५ हजार हेक्टरवरील पूर्वहंगामी कापूस पीक काढण्यात आल्याचा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Supply Schemes Issue: निधीअभावी जलजीवन मिशनच्या ६८ पाणीपुरवठा योजना रखडल्या

Cotton Farming Techniques: हेक्टरी १२ ते १४ क्विंटल कापूस उत्पादनाचे उद्दिष्ट; शास्त्रीय तंत्रज्ञानाचा अवलंब करा

Farmer Loan Waiver: नांदेडमध्ये एक लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती

PM Kisan 24th Installment: शेतकऱ्यांना दिवाळीआधी २ हजार मिळणार; 'पीएम किसान'च्या २४ व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर

Food Conservation: अन्नाची बचत हीच अन्ननिर्मिती; अन्न-पाण्याची नासाडी टाळा : डॉ. इंद्र मणी मिश्रा

SCROLL FOR NEXT