Cotton Rate : अनेकांचे फरदड कापूस पीक उभेच राहणार

खानदेशात अनेक शेतकऱ्यांचे फरदड कापूस पीक उभेच राहणार आहे. कारण कापूस दर बऱ्यापैकी आहेत.
 Cotton Market
Cotton MarketAgrowon

जळगाव ः  खानदेशात अनेक शेतकऱ्यांचे फरदड कापूस पीक (Cotton Crop) उभेच राहणार आहे. कारण कापूस दर (Cotton Rate) बऱ्यापैकी आहेत. यातच कृषी विभागाचे फरदड किंवा खोडवा कापूस पीक न घेण्याचे आवाहन शेतकऱ्यांनी झुगारले आहे. यातच गुलाबी बोंड अळी रोखण्यात कृषी विभाग अपयशी ठरेल, असे दिसत आहे.

 Cotton Market
Farmer CIBIL : शेती कर्जासाठी सीबीलची अट नकोच

गुलाबी बोंड अळी रोखण्यासाठी बियाण्यात रेफ्युज (नॉन बीटी) बियाणे मिसळले जात आहे. दोन वर्षे विविध उपाय केले जात आहेत. पण गुलाबी बोंड अळी नोव्हेंबरमध्येच धुमाकूळ घालत आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. यात यंदा कापूस दर बऱ्यापैकी असल्याने व इतर पिकांमध्ये फारसा नफा दिसत नसल्याने शेतकऱ्यांनी फरदड कापूस पीक घेण्याचे नियोजन केले आहे.

जळगाव, चोपडा, जामनेर, धुळ्यातील शिरपूर आदी भागांत अनेक शेतकऱ्यांचे फरदड कापूस पीक उभेच आहे. या पिकात दोनदा अळीनाशके व इतर फवारण्या शेतकऱ्यांनी घेतल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी खतेही दिली आहेत. तसेच फवारणी, ड्रीपमधूनही खते देण्याचे प्रयत्न केले आहेत. यामुळे उत्पादनाबाबत शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. पण यामुळे गुलाबी बोंड अळीचा प्रकोप पुढे वाढेल, असे दिसत आहे.

 Cotton Market
co-operative milk unions : सहकारी दूध संघांतील भ्रष्टाचाराची चौकशी करा

कारण पीक उभे असल्याने अळीचा अधिवास पुढेही राहणार आहे. खानदेशात सुमारे एक लाख हेक्टरवर पूर्वहंगामी कापसाची लागवड झाली होती. यातील ७० टक्के पीक विविध रोग, पानगळ, गुलाबी बोंड अळीमुळे रिकामे झाले आहे. पण ३० ते ३२ टक्के क्षेत्रात फरदड कापूस पीक उभेच आहे.

फरदड पीक घेण्यासाठी काही शेतकरी फवारणी, खतांचेही नियोजन करीत आहेत. कारण कापूस दर सध्या बरे आहेत. किमान दोन क्विंटल उत्पादनही फरदड कापूस पिकातून आल्यास तेवढा नफा हाती येईल. कारण रब्बी पिकांनाही खर्च अधिक लागतो. दुसरीकडे वीज कंपनी वीज संयोजन बंद करण्याचे इशारे वारंवार देत आहे. या स्थितीत अनेकांना फरदड कापूस पीक परवडणारे दिसत आहे.

जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, जळगाव, अमळनेर, पारोळा, चाळीसगाव, भडगाव, जामनेर या भागांत अनेक शेतकरी फरदड कापूस पिकाचे नियोजन करीत आहेत. तसेच धुळ्यातही फरदड कापूस पीक अधिक राहील, असे चित्र आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com