Fardad Kapashi : फरदड कपाशी का घेऊ नये?

Anil Jadhao 

कापसाला चांगला उठाव असल्याने कपाशीचे पीक काढण्या ऐवजी पाणी, खताच्या मात्रा देउन कपाशीचा पुर्णबहार म्हणजेच फरदड घेण्यावर शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. 

फरदड पिकामध्ये जोमदार उत्पादन मिळण्यासाठी पाणी, खतं, कीटकनाशकं यांचा वापर केला जातो. या पध्दतीमुळे कापूस पीक शेतामध्ये फेब्रुवारी-मार्च महिन्यानंतरही राहते.

पुन्हा कपाशी लागवडीचा खर्च टाळण्यासाठी खरीप हंगामामध्ये लागवड झालेल्या कापूस पिकापासूनच फरदड कापसाचे वाढीव उत्पादन घेण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो.

मात्र, या पध्दतीमुळे शेतीमध्ये दीर्घकाळ पीक राहिल्याने गुलाबी बोंडअळीच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होतं. गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम लक्षात घेता तिचं शाश्वत व्यवस्थापन करण्यासाठी वेळेवर हंगाम संपविणं गरजेचं आहे. म्हणून कोणत्याही परीस्थितीत शेतकऱ्यांनी फरदड घेऊ नये.

शेतकऱ्यांनी वेळेवर कपाशीची वेचनी करुन डिसेंबर नंतर शेतामध्ये कपाशीचे पिक ठेवू नये. हंगाम संपल्यानंतर शेतामध्ये जनावरे किंवा शेळया, मेंढया चरण्यासाठी सोडाव्यात. हंगाम संपल्यावर ताबडतोब पऱ्हाटीचा बंदोबस्त करावा.

शेतात किंवा शेताजवळ प-हाटी रचुन ठेवू नये. कारण पऱ्हाटीत गुलाबी बोंडअळीच्या सुप्त अवस्था असतात. रोटोवेटर ऐवजी चुरा करणारे यंत्र श्रेडरच्या सहाय्याने प-हाटीचा बारीक चुरा करुन कंपोष्ट खतासाठी उपयोग करावा. जिनींग मिल व साठविलेल्या ठिकाणी कामगंध सापळयाचा वापर करावा.

cta image