heavy rain  Agrowon
ताज्या बातम्या

Rain : राज्यात विविध भागांत मुसळधार पावसाची हजेरी

पिकांचे नुकसान; दुष्काळी भागात पिकांना दिलासा

Team Agrowon

पुणे : राज्याच्या विविध भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस (heavy rain) पडत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उन्हाचा चटका, उकाड्यापाठोपाठ काळ्याकुट्ट ढगांची निर्मिती होऊन विजा, मेघगर्जनेसह मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसाचे प्रमाण जास्त असलेल्या भागात पिकांचे नुकसान होणार आहे. दर दुष्काळी भागात पिकांना जीवदान मिळणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. देवगड तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. मालवण तालुक्यात संततधार आहे. याशिवाय जिल्ह्याच्या इतर भागांतदेखील पावसाचे प्रमाण वाढले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत आहे. मागील १५ दिवस पावसाने विश्रांती घेतल्यामुळे कातळावरील शेती संकटात सापडली होती. संगमेश्वर, चिपळूण या तालुक्यांना झोडपून काढले.

नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसामुळे बिलोली तालुक्यातील रामतीर्थ व मुखेड तालुक्यातील चांडोळा महसूल मंडलांत अतिवृष्टी झाली. जिल्ह्यात अनेक तालुक्यांत पावसाचे प्रमाण चांगले होते. यामुळे कापूस, सोयाबीन पिकाला दिलासा मिळाला आहे. बीड जिल्ह्यातील चार व उस्मानाबाद जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली आहे.

सांगली जिल्ह्यातील विविध भागांत शुक्रवारी (ता. ९) दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. शेतात पाणी साचले. सोयाबीन, उडीद यासह अन्य पिके पाण्याखाली होती. द्राक्ष फळ छाटणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सततच्या पावसाने पिके धोक्यात आली आहेत.
..........
--चौकट--
मंगळवार (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मि.मीमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :
कोकण : कल्याण ११०, ठाणे ९०, अंबरनाथ ८०, उल्हासनगर ७०, तलासरी, पेण, मालवण, वेंगुर्ला, हर्णे, माथेरान प्रत्येकी ५०.
मध्य महाराष्ट्र : चांदवड ५०, सातारा, नांदगाव, माळशिरस, ओझरखेडा प्रत्येकी ४०, लोणावळा, वाई, पिंपळगाव बसवंत, इगतपुरी प्रत्येकी ३०.
मध्य महाराष्ट्र : उमरी ७०, कंधार ६०, बिलोली, तुळजापूर, मुखेड, देवणी प्रत्येकी ५०, देगलूर ४०, लातूर, चाकूर, धर्माबाद, कन्नड, लोहा, उदगीर, जळकोट, रेनापूर प्रत्येकी ३०.
विदर्भ : सिरोंचा १००, देऊळगाव राजा ३०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT