Rain Update : ऑगस्टअखेर राज्यात १८ टक्के अधिक पाऊस

जुलै महिन्यापाठोपाठ ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाचा तडाखा सुरूच राहिला, मात्र अखेरच्या टप्प्यात पावसाचा जोर कमी होऊन अनेक भागात उघडीप मिळाली.
Monsoon Rain
Monsoon RainAgrowon

पुणे : जुलै महिन्यापाठोपाठ ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाचा (Monsoon Rainfall) तडाखा सुरूच राहिला, मात्र अखेरच्या टप्प्यात पावसाचा जोर (Rain Intensity) कमी होऊन अनेक भागात उघडीप मिळाली. १ जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत राज्यात ९५७.१ मिलिमीटर म्हणजेच १८ टक्के अधिक पावसाची नोंद (Monsoon Rain Statistics) झाली आहे. कोकणात पावसाने सरासरी गाठली असून, उर्वरित राज्यात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला आहे.

यंदाच्या हंगामाचा विचार करता जून महिन्यात पूर्वमोसमी पावसाची दडी, मॉन्सूनच्या पावसाचा अभाव यामुळे राज्यात १४७.५ मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या अवघा ७० टक्के पाऊस पडला होता.

मात्र जुलै महिन्यात राज्यात सर्वदूर दमदार पाऊस कोसळल्याने जुलैअखेरपर्यंत राज्यात ६७७.५ मिलिमीटर म्हणजेच २७ टक्के अधिक पावसाची नोंद झाली होती. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात अनेक भागात अतिवृष्टी झाली. त्यामुळे ओल्या दुष्काळाची स्थिती आणखी बिकट झाली. मात्र दुसऱ्या पंधरवड्यात काही भागांत पावसाने दडी मारल्याचे चित्र पाहायला मिळाले. यात काही ठिकाणी तर १५ ते २२ दिवस पावसाची उघडीप असल्याने पेरणी झालेली पिके करपू लागली. ऑगस्टमध्ये मराठवाड्याचा बहुतांश भाग व लगतचा उत्तर महाराष्ट्र आणि पश्‍चिम विदर्भातील जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले.

Monsoon Rain
Crop Damage : यवतमाळला नुकसानीच्या मदतीसाठी हवे ५३८ कोटी

कमी कालावधीत जोरदार पावसाने ऑगस्ट महिन्याची सरासरी गाठली असली, तरी पावसाने असमान वितरण हे वैशिष्ट्य ठरले. विभागनिहाय पडलेल्या पावसाची स्थिती पाहता ऑगस्ट अखेरपर्यंत कोकण विभागात सरासरी पाऊस झाला. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा २१ टक्के अधिक, तर विदर्भात सरासरीपेक्षा २५ टक्के अधिकपाऊस झाल्याचे हवामान विभागाच्या नोंदीवरून स्पष्ट झाले.

ऑगस्ट महिन्यात पहिल्या दोन आठवड्यांत चांगला पाऊस झाला. महिन्याभरात अरबी समुद्रात एक, बंगालच्या उपसागरात तीन अशा एकूण चार कमी दाब प्रणाली तयार झाल्या. तीव्रता अधिक असलेल्या (डिपेशन) या प्रणाली महिन्यात तब्बल १९ दिवस सक्रिय राहिल्या.

Monsoon Rain
Monsoon Update : ईशान्य मॉन्सूनच्या पावसाची शक्‍यता

जिल्हानिहाय पावसाचे प्रमाण (तफावत टक्क्यांत) :

सरासरीपेक्षा अधिक (२० ते ५९ टक्के अधिक) : पालघर, धुळे, पुणे, सातारा, उस्मानाबाद लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

सरासरी इतका (उणे १९ ते १९ टक्के अधिक) : मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदूरबार, जळगाव, नगर, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती. सरासरीपेक्षा कमी (उणे ५९ ते उणे २० टक्के) : सांगली

सांगलीत सर्वांत कमी, नाशिकमध्ये सर्वाधिक पाऊस

राज्यातील जिल्हानिहाय पडलेल्या पावसाची स्थिती पाहता पश्‍चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात यंदा पावसाची दडी असल्याचे चित्र आहे. सांगली जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत उणे २१ टक्के पाऊस पडला आहे. तर नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ५४ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. पालघर, धुळे, पुणे, सातारा, उस्मानाबाद लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असून, उर्वरित राज्यात सरासरीइतक्या पावसाची नोंद झाली आहे.

ऑगस्टअखेरपर्यंत विभागनिहाय पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

विभाग सरासरी पडलेला टक्केवारी

कोकण-गोवा २४९६.७ २६०५.२ ४

मध्य महाराष्ट्र ५८८.४ ७१३.४ २१

मराठवाडा ४८१.९ ५८२.९ २१

विदर्भ ७८१.८ ९७९.१ २५

ऑगस्ट अखेरपर्यंत जिल्हानिहाय पावसाची स्थिती, सरासरीच्या तुलनेत तफावत

जिल्हा सरासरी पडलेला तफावत

मुंबई शहर १७५८.५ १५०८.६ उणे १४

पालघर १९३८.३ २५१६.२ ३०

रायगड २६८९.७ २६४४.६ उणे २

रत्नागिरी २७८३.४ २८७९.६ ३

सिंधुदुर्ग २६०६.७ २६९१.८ ३

मुंबई उपनगर १९५९.२ २०८८.२ ७

ठाणे २०८७.१ २२६५.२ ९

नगर ३०८.७ ३२९.९ ७

धुळे ४२८.३ ५५४.२ २९

जळगाव ४९९.० ४८९.७ उणे २

कोल्हापूर १५००.९ १६३८.० ९

नंदूरबार ६९१.३ ७८९.८ १४

नाशिक ७१५.७ ११०३.४ ५४

पुणे ७६४.८ १००५.३ ३१

सांगली ३५२.८ २७९.८ उणे २१

सातारा ६८७.० ८६५.२ २६

सोलापूर २९२.४ ३९२.४ १२

औरंगाबाद ४१३.६ ४८३.३ १७

जिल्हा सरासरी पडलेला तफावत

बीड ३९१.६ ४६०.३ १८

हिंगोली ६१६.१ ५५०.४ उणे११

जालना ४५०.६ ४२८.३ उणे ५

लातूर ४९०.३ ६१२.५ २५

नांदेड ६२२.० ९४३.७ ५२

उस्मानाबाद ४००.४ ५३१.२ ३३

परभणी ५३६.३ ५८६.६ १०

अकोला ५७८.३ ४९९.६ १४

अमरावती ६७८.९ ७१२.८ ५

भंडारा ९११.६ ११९४.५ ३१

बुलडाणा ५२४.३ ४७९.१ उणे ९

चंद्रपूर ९०५.३ ११५८.० २८

गडचिरोली १०८८.० १४७६.० ३६

गोंदिया १०३२.८ १३३९.४ ३०

नागपूर ७७७.६ ११४४.४ ४७

वर्धा ६९०.८ १०५५.३ ५३

वाशीम ६३२.६ ६५७.६ ४

यवतमाळ ६७६.६ ८५१.५ २६

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com