Monsoon Rain Agrowon
ताज्या बातम्या

Pre-Monsoon Rain : नाशिक जिल्ह्यात पूर्वमोसमी वादळी पावसाने दाणादाण

Latest Rain Update : पूर्वमोसमी पावसाने रविवारी (ता.४) जिल्ह्यात हजेरी लावली. अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. तर काही भागांत गारपीट झाली.

Team Agrowon

Nashik News : पूर्वमोसमी पावसाने रविवारी (ता.४) जिल्ह्यात हजेरी लावली. अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. तर काही भागांत गारपीट झाली. त्यामुळे दाणादाण उडाली आहे.

मालेगाव, सुरगाणा, येवला, सिन्नर, नाशिक, निफाड, कळवण, नांदगाव, चांदवड, देवळा, दिंडोरी व इगतपुरी तालुक्यांत पावसाचा जोर राहिला. वादळी वाऱ्याने अधिक फटका बसला. मालेगाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे.

जिल्ह्याच्या अनेक भागांत रविवारी वादळी वाऱ्याने धडकी भरवली. त्यामध्ये मालेगाव तालुक्याच्या उत्तर पूर्व भागात वादळी वाऱ्याने मोठा तडाखा दिला. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. अनेक शेतकऱ्यांचा साठवलेला कांदा भिजला. तर शेवगा व पपई लागवडी आडव्या झाल्या. घरांवरील पत्रे उडाले. तर कुक्कुटपालन शेड तालुक्यात भुईसपाट झाले.

सटाणा तालुक्याच्या पश्चिम, उत्तर-पूर्व भागांतही पावसाने पुन्हा मोठा तडाखा दिला. जायखेडा, ब्राम्हणगाव, तळवाडे दिगर, डांगसौंदाणे, तांदूळवाडी आदी गावांत पावसासह वादळी वाऱ्याने भाजीपाला पिके, घरे व झाडांचे नुकसान झाले. आंब्याच्या कैऱ्या गळून पडल्या. कांदा पावसात भिजल्याने पुन्हा एकदा नुकसान झाले.

येवला तालुक्यात वादळी पावसाचा जोर राहिला. धामणगाव, आनकई, सावरगाव, शेवगे, चिंचोडी, साताळी परिसरात मोठे वादळ आले. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे आडवी झाली तर पत्रे उडाले.

निफाड तालुक्याच्या गोदाकाठ परिसर, पूर्व भागात वाऱ्यासह पावसाचा जोर होता. त्यामुळे कांदा चाळीवरील कागद उडाल्याने कांदा भिजला. सुरगाणा, इगतपुरी तालुक्यातही पावसाने दणका दिला.

सिन्नरच्या उत्तर भागात गारपीट

सिन्नर तालुक्यातील विंचूरी दळवी परिसरात १५ मिनिटे जोरदार गारपीट आली. त्यानंतर अर्धा तासाच्यावर जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे परिसरात शेतात पाणी साचले. काही ठिकाणी पाणी वाहिले. मधुमका, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement Date Extension : कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी सीसीआयचा महत्वाचा निर्णय

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर

Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

Bageshwari Lake: बागेश्वरी तलाव परिसर पर्यटनाचे नवे केंद्र

Maize Procurement: मक्याचे दर घसरले; २५ हजार क्विंटल खरेदीवर ब्रेक

SCROLL FOR NEXT