Unseasonal Rain Update : अमरावतीत अकरा हजार हेक्टरमधील पिकांना अवकाळीचा फटका

Unseasonal Rain Crop Damage : एप्रिल व मे महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील ११ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Amravati Rain News : अमरावतीत झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील ११ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यासाठी जिल्हा महसूल यंत्रणेने शासनाकडे २३.५८ कोटी अनुदानाच्या मागणीचा प्रस्ताव पाठविला आहे.

या पावसाचा सर्वाधिक फटका फळबागांना बसला आहे. खरीप हंगामापूर्वी भरपाई मिळाल्यास शेतकऱ्यांना त्याचा उपयोग लागवडीकरिता करता येणार आहे.

Crop Damage
Unseasonal Rain : नैसर्गिक आपत्तीमुळे सहा कोटींचा फटका

गेल्या खरीप हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी व संततधार पावसामुळे पिकांची हानी झाली होती. त्यानंतर परतीच्या पावसानेही ऐन कापणीच्या वेळेस पिकांना तडाखा दिला. त्यामुळे उत्पादनाच्या सरासरीवर परिणाम होऊन उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले.

हरभरा पीक काढणीवर असताना व काही भागात गंज्या लागल्या असताना अवकाळीने तडाखा दिला. तर, ओंबीवर आलेल्या व काढणी सुरू असताना अवकाळीने आगमन करून नुकसान केले. फळबागांनाही या पावसाचा मोठा तडाखा बसला.

८ ते ३० एप्रिल या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने गहू व हरभरा या पिकांसह संत्रा, केळी, लिंबू या फळपिकांची नासाडी झाली.

...असे झाले क्षेत्रनिहाय नुकसान

८ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने २१९७ हेक्टर क्षेत्रातील बागायती पिकांची हानी झाली. त्याचा थेट फटका ४६४५ शेतकऱ्यांना बसला. तर मे महिन्यातील पावसाने १२६ हेक्टर क्षेत्रातील बागायती पिकांचे नुकसान झाले.

एप्रिल व मे या दोन्ही महिन्यांत ८६९५ हेक्टर क्षेत्रातील फळबागांचे नुकसान झाले असून त्याचा ११,३३४ शेतकऱ्यांना फटका बसला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com