Cotton Sowing  Agrowon
ताज्या बातम्या

Cotton Cultivation : मॉन्सूनपूर्व कपाशी लागवडीला वेग

Cotton Sowing : पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा या जिल्ह्यांत मॉन्सूनपूर्व कपाशी लागवडीने सध्या जोर धरला आहे.

Team Agrowon

Akola News : पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा या जिल्ह्यांत मॉन्सूनपूर्व कपाशी लागवडीने सध्या जोर धरला आहे. शासनाने एक जूनपासून कपाशी बियाणे विक्रीला परवानगी दिल्याने आता लागवड जोमाने सुरू झाली आहे. कपाशी लागवडीची कामे केली जात आहेत.

खरिपात सोयाबीन व नंतर कापूस ही दोन पिके महत्त्वाची राहतात. यंदा कपाशीचे क्षेत्र सरासरीएवढेच राहू शकेल अशी अपेक्षा आहे. बाजारात कापसाचा दर या वर्षात कमालीचा अस्थिर राहल्याने शेतकरी द्विधा मनस्थितीत आहेत. अशाही परिस्थितीत सिंचनाची सोय असलेले शेतकरी कपाशीच्या लागवडीला लागले आहेत.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच या लागवडीची तयारी सुरू झाली होती. सऱ्या पाडणे, ठिबकच्या नळ्या टाकणे, तुषार सिंचनाने शेत भिजवणे अशी कामे सर्वत्र सुरू झाली होती. बोंडअळी निर्मुलनाच्या उद्देशाने कपाशीचे बियाणे अधिकृतपणे एक जूननंतर उपलब्ध राहील असे आवाहन केले होते. त्यानुसार आता बाजारात कृषी केंद्रांवर सर्वत्र बीटी बियाणे उपलब्ध झालेले आहे.

पूर्वानुभव पाहून शेतकरी कपाशीच्या वाणांची निवड करीत आहेत. बीटी कपाशी प्रामुख्याने लवकर येणारे वाण असल्याने दुसरे पीक घेण्यासाठी संबंधित शेती रब्बीमध्ये कशी होईल, अशा स्वरूपाचे नियोजन शेतकरी करीत असतात.

यंदा कपाशी व्यवस्थापनाच्या खर्चात मशागत, पेरणीसाठी महिलांची मजुरी तसेच रासायनिक खतांचा खर्च पहिल्या टप्प्यातच वाढलेला आहे. याची झळ शेतकऱ्यांना झेलावी लागत आहे. चांगल्या उत्पादनाच्या आशेवर शेतकरी लागवडीच्या कामात व्यस्त झाले आहेत.

कुठे पीक उगवले, तर कुठे लागवड

कपाशीच्या क्षेत्रात प्रामुख्याने सातपुड्याच्या पायथ्याला असलेल्या भागात सिंचन सुविधा असलेले शेतकरी मॉन्सूनपूर्व कपाशी लागवडीला प्राधान्य देतात. या लागवडीच्या क्षेत्रात चांगले उत्पादन मिळते असा अनुभव आहे.

बऱ्याच शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या अखेरीस लागवड केलेली असून हे पीक अंकुरले आहे. कुठे झाडावर दोन ते तीन पाने दिसत आहेत. तर सर्वसाधारणपणे कपाशीची लागवड आता होऊ लागली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ujani Floating Solar Project: उजनी जलाशयावर केवळ नऊ टक्के क्षेत्रावरच ‘फ्लोटिंग सोलार’ प्रकल्प; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे स्पष्टीकरण

Wild Boar Attack: शेतशिवारात रानडुकरांचा हैदोस; कपाशी पिकाचे नुकसान

Drought Management: बांधबंदिस्ती, जलसंधारण, पीक नियोजनानेच दुष्काळावर मात शक्य; पोपटराव पवार

Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगरला जिल्हा बॅंकेच्या दहा जागांसाठी उद्या मतदान; एकूण सत्तावीस उमेदवार; मंगळवारी मतमोजणी

Maize Trading: चांदूरबाजारमध्ये मक्याची उलाढाल वाढली

SCROLL FOR NEXT