Dr. Pramod Chaudhari Agrowon
ताज्या बातम्या

Praj Industry : मांदेडे गाव ‘नेट झीरो’ करण्याचा ‘प्राज’चा संकल्प

Dr. Pramod Chaudhari : जागतिक जैवइंधने व जैव रासायनिक क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान व अभियांत्रिकी सेवा देण्याचे काम ‘प्राज’ करते.

Team Agrowon

Pune News : ‘‘कर्बभाररहित आणि हवामान बदलांना सकारात्मक प्रतिसाद देण्याची क्षमता असलेले गाव म्हणून मांदेडे गावाचा विकास करण्यात येईल,’’ अशी घोषणा ‘प्राज’चे संस्थापक व कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी केली.

जागतिक जैवइंधने व जैव रासायनिक क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान व अभियांत्रिकी सेवा देण्याचे काम ‘प्राज’ करते. मांदेडे (ता. मुळशी) ‘नेट झीरो’ करण्यासाठी ‘गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अॅण्ड इकॉनॉमिक्स’ या संस्थेचे सहकार्य घेतले जात आहे.

अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे या उपक्रमाचे ब्रॅण्ड अॅम्बेसिडर असतील. श्री. चौधरी यांनी शुक्रवारी (ता.१६) एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. या वेळी गोखले इन्स्टिट्यूटचे डॉ. गुरुदास नूलकर, मांदेडेच्या सरपंच सविता वीर व ‘प्राज’चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

“मांदेडे ‘नेट झीरो’ करण्यासाठी आरोग्य, ऊर्जा, पाणी, जीवनमान विकास, घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापनावर दोन वर्षे कामे केले जाईल. याशिवाय पाणलोट व्यवस्थापन, ऊर्जानिर्मितीक्षम पीक लागवड, जैवप्रकल्पांसाठी पुरवठासाखळी व्यवस्थापन, पीक अवशेष व औद्योगिक वापरातील कच्च्या मालाच्या व्यवस्थापनावर गावकऱ्यांना मार्गदर्शन केले जाईल,” असे श्री. चौधरी म्हणाले.

‘नेट झीरो’तील उपक्रमांमुळे मांदेडेतील उदरनिर्वाहाचे स्रोत वाढतील व गाव सोडून गेलेले ग्रामस्थ पुन्हा परतण्याची शक्यता आहे. त्यासाठी सध्या गोखले इन्स्टिट्यूटकडून माहिती संकलन सुरू आहे. त्यात गावातील ऊर्जेच्या गरजा, उदरनिर्वाहाची साधने, पाण्याची गरज, पाणलोटाचे नकाशारेखन, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, हवामान बदलामुळे आरोग्याचे उद्‍भविणारे प्रश्‍न या मुद्यांचा समावेश आहे.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती, ग्रामसभा याशिवाय गावातील सर्व वयोगटातली युवक-युवती, महिलांची मते विचारात घेतली जातील. आरोग्य, ऊर्जा, पाणीसाठा, घनकचरा, सांडपाणी याबाबत ग्रामसभेची मते जाणून घेतली जातील. त्यासाठी ‘माझ्या स्वप्नातील मांदेडे गाव’ या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली जाईल, असेही श्री. चौधरी यांनी स्पष्ट केले.

...‘नेट झीरो’ गावाची ध्येय्ये

- लाकूड व जीवाश्म इंधनाचा वापर थांबविणे

- हरित ऊर्जेचा पर्याय प्रत्येक घरासाठी उपलब्ध करून देणे

- घरगुती पद्धतीचे बायोगॅस संयंत्र स्थापित करणे

- हरित ऊर्जेसाठी गावात सौर विद्युत गृह उभारणे

- घरे व सार्वजनिक ठिकाणी ‘एलईडी रेट्रोफिट्‍स’चा वापर

- ग्रामस्तरीय कचरा व्यवस्थापन यंत्रणेची उभारणी

- गावकऱ्यांच्या विकासासाठी कृषी आधारित उपक्रम

- सेंद्रिय खतपुरवठा, शेतीमालासाठी बाजारांशी जोडणी

- मूल्यवर्धित कृषी उत्पादनात वाढ, स्वयंरोजगार

- जलसंधारण, ऊर्जा, आरोग्य, बचत गट संकल्पनेवर काम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing 2025: देशात खरीप पेरणीला वेग; कापूस, सोयाबीन, तूर पिछाडीवर

ZP School Admission : झेडपी शाळेत प्रवेश घेतल्यास होणार कर माफ

Free Sand Policy : घरकुल लाभार्थ्यांना चार टक्केच वाळूचा पुरवठा

Crab Farming : बंदीस्त खेकडा पालन करण्यासाठी प्रोत्साहन

Livestock Support: पशुपालकांना आता मिळणार शेतीसारख्या सवलती; ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना

SCROLL FOR NEXT