Poultry Industry Agrowon
ताज्या बातम्या

Poultry Industry : खाद्यदरवाढीने कुक्कुट व्यवसाय अडचणीत

पशुखाद्यात सतत वाढ होत असल्याने पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आला आहे. एका कोंबडीच्या व्यवस्थापनावर ८५ रुपये खर्च येत आहे.

Team Agrowon

Poultry Industry Update नागपूर / नाशिक : पशुखाद्यात (Poultry Feed) सतत वाढ होत असल्याने पोल्ट्री व्यवसाय (Poultry Business) अडचणीत आला आहे. एका कोंबडीच्या व्यवस्थापनावर (Poultry Management) ८५ रुपये खर्च येत आहे. विक्री मात्र, ७० रुपयांत करावी लागत असल्याची स्थिती आहे. या शिवाय कुक्कुटखाद्याच्या कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्याचा मोठा फटका बसला आहे.

पिलांच्या दरात घसरण झाली तर उपलब्धता असल्याने संगोपन वाढले आहे. त्यातच सणासुदीच्या काळात मागणी मंदावली. त्याचा फटका दराला बसला. उत्पादन खर्चापेक्षा विक्री दर कमी झाला.

त्यामुळे मागील महिनाभरापासून कुक्कुटपालकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून दरात सुधारणा होत असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

शेतकऱ्यांसाठी पूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालनाकडे पाहिले जात असले तरी सध्या या व्यवसायात अनिश्चितता वाढली आहे.

कोंबड्यांच्या खाद्यात मुख्यतः मका, भुईमूग, सोयाबीन, ज्वारी, बाजरीचा समावेश होतो.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा या खाद्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे कुक्कुटपालक मेटाकुटीला आले आहेत. उन्हाळ्यात पाण्याच्या समस्येमुळे कोंबड्यांना वाचवणे अधिकच जिकरीचे होणार आहे.

यंदा उत्पादन अधिक असल्याने अंडी आणि चिकनचे भाव घसरले आहेत. त्याचवेळी, कोंबड्यांचे खाद्यदर वाढत आहेत.

कोंबड्यांच्या खाद्याचे दर दोन वर्षांपासून चढेच आहेत. त्यामुळे अडचणी येत आहेत. कच्च्या मालाच्या किमतीमुळे धान्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

त्यामुळे कुक्कुट व्यवसायाची अवस्था दयनीय झाली आहे. तसे पाहिल्यास, एक कोंबडी दररोज सुमारे ११० ग्रॅम धान्य खाते आणि १२० ते १५० दिवसांनी अंडी घालू लागते.

‘‘मक्याचे दर वाढले. तर सोयाबीन उत्पादन वाढून ते दर त्याप्रमाणात कमी झाले नाहीत. त्यामुळे कुक्कुटखाद्याच्या संगोपन खर्चात वाढ होत आहे.

तर पिलांच्या किमती ३० रुपयांवरून १७ ते १८ रुपयांवर आल्या. पिलांची उपलब्धता व १२ रुपयांनी दरात घसरण यामुळे संगोपन वाढविण्यात आल्याची स्थिती होती.

मात्र आता दर सुधारत असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे,’’ अशी माहिती महाराष्ट्र पोल्ट्री फार्मर्स व ब्रीडर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष उद्धव अहिरे यांनी दिली.

...असे आहेत दर (रुपये...प्रतिकिलो)

खाद्य...मागील दर...आताचे दर

सोयाबीन पेंड...४५...४७

मका...२१...२३

तांदूळ कणी...१५...२०

शेंगदाणा ढेप...३०...३२

दर सुधारल्याने काहीसा दिलासा

मागीलवर्षी मार्च ते मे दरम्यान दर चांगले मिळाले होते. त्यामुळे कुक्कटपालकांनी उत्पादन अधिक घेतले. मात्र मागणी कमी होऊन पुरवठा वाढल्याने संपूर्ण देशभरात दर कोसळले होते. मात्र गुरुवार (ता.१३) पासून दरात सुधारणा दिसून आली आहे.

दर ८५ रुपये किलोला मिळत असून उत्पादन खर्चाच्या बरोबरीने तो आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर दरात सुधारणा होण्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

कोंबड्यांच्या खाद्यात विक्रमी भाववाढ झाल्याने कुक्कुटपालन हा शेतकऱ्यांसाठी आता जोडधंदा राहिलेला नाही. खेळते भांडवल वाढून नफा कमी झाला आहे. गत दोन वर्षांपासून कुक्कुटपालकांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. महागाईमुळे खर्च काढणेही कठीण होत आहे.
- डॉ. जी. एस. वानखेडे, कुक्कुट व्यावसायिक
बहुतांश शेतकरी करारावर पोल्ट्री व्यवसाय करतात. गेल्या अनेक वर्षांपासून पाच रुपये प्रतिकिलो संगोपन दर दिला जातो. परंतु उत्पादकता खर्चाच्या तुलनेत विक्री दर कमी असल्याने गेल्या तीन महिन्यांत ६ लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागले. कंपन्यांनी संगोपन दर हा दहा रुपये करणे अपेक्षित आहे. समन्वय समिती न्याय द्यावा.
- आकाश खुरद, लसणापूर, अमरावती.
करारदार कंपन्या तीन किलोचा पक्षी करतात. त्यामुळे पशुखाद्य वापर रेशो वाढतो. परिणामी करारावर कुक्कुट व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांवरच रिकव्हरी काढली जाते.
- शुभम महल्ले, अमरावती पोल्ट्री असोसिएशन.
गेल्या दोन महिन्यांपासून अस्थिर आहेत. त्यातच मका व सोयापेंड दरात तेजी कायम आहे. त्यामुळे उत्पादक खर्च व चिकन दर कमी आहेत. कुक्कुटपालकांना तोटा सहन करावा लागला आहे.
- मनोज कापसे, कुक्कुटपालक, वाखारी, ता. देवळा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Forest Rights Act: कागदपत्रांमध्ये अडकला वनहक्क मान्यता कायदा

Sugarcane Transport Rule: ऊस काटामारी रोखण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारचा निर्णय

Soybean MSP: सोयाबीनची हमीभाव खरेदी ठरतेय मृगजळ

Turmeric Rate: हिंगोलीला हळदीला १६,५००, तर वसमतला १७,३१० रुपये दर

Milk Price: दूध खरेदी दर वाढेना!

SCROLL FOR NEXT