Cold Weather Agrowon
ताज्या बातम्या

Cold Weather : राज्यात डिसेंबरमध्ये थंडीचा जोर

यंदाच्या हिवाळ्यात महाराष्ट्राच्या बहुतांशी भागात किमान तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याने राज्यात थंडी अधिक असण्याची शक्यता आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : यंदाच्या हिवाळ्यात (Winter) महाराष्ट्राच्या बहुतांशी भागात किमान तापमान (Minimum Temperature) सरासरी ते सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याने राज्यात थंडी (Cold) अधिक असण्याची शक्यता आहे. तर डिसेंबर महिन्यात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता अधिक असल्याने थंडी वाढण्याचे संकेत हवामान विभागाने (Weather Department) दिले आहेत.

हिवाळा हंगामातील (डिसेंबर ते फेब्रुवारी) तापमानाचा अंदाज, तसेच डिसेंबर महिन्यातील कमाल, किमान तापमान आणि पावसाचा अंदाज वर्तविण्यासाठी गुरूवारी (ता. १) आयोजित ऑनलाइन पत्रकार परिषदेत हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी ही माहिती दिली.नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात राज्यात किमान तापमानात घट झाली. अनेक ठिकाणी तापमान ७ ते १० अंशांपर्यंत खाली घसरल्याने राज्यात गुलाबी थंडी अनुभवायला मिळाली.

मात्र सध्या राज्याच्या किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी कमी झाली आहे. तर राज्यात उन्हाचा चटका वाढल्याचे, तसेच ढगाळ हवामानामुळे उकड्यातही काहीशी वाढ दिसून आली आहे.

यंदाच्या हिवाळ्यात (डिसेंबर ते फेब्रुवारी) दक्षिण भारत, लगतचा मध्य भारतातील राज्यात किमान आणि कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता अधिक आहे. तर वायव्य आणि ईशान्य भारताच्या बहुतांशी भागात किमान तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे.

तर वायव्य, पूर्व आणि ईशान्य भारतातील राज्यात दिवसाचे कमाल तापमानही सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्यात दक्षिणेकडील राज्ये, महाराष्ट्रासह मध्य भारताचा बहुतांशी भागात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

तर वायव्य आणि ईशान्येकडील राज्ये आणि पूर्व भारतात किमान तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. या भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात दक्षिण भारताच्या पूर्व किनाऱ्यावर सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक तर उर्वरित देशात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.

नोव्हेंबर महिन्यात २१ ते ३० या कालावधीत मध्य आणि वायव्य भारतातील राज्यात ७ ते १० अंश तापमान झाले. मात्र तीव्र थंडीच्या लाट दिसून आली नाही. पश्चिमी चक्रावात आणि कमी दाब क्षेत्राचा अभाव, मेडियन ज्युलियन असोलेशन पोषक नसल्यामुळे पावसाचे प्रमाण कमी राहिले. प्रशांत महासागरात ला-निना स्थिती मार्चअखेरपर्यंत कायम राहील. तसेच इंडियन ओशन डायपोल (आयओडी) देखील सर्वसामान्य स्थितीत राहण्याची शक्यता आहे.

- डॉ. मृत्युंजय महापात्रा, महासंचालक, हवामान विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cold Season : राज्यात थंडीचा कडाका टिकून; पुढील काही दिवस राज्यात थंडी कायम राहण्याचा अंदाज

LPG Cylinder Prices: घरगुती गॅस सिलिंडर खरंच महाग होईल का?; अनुदानाचं सूत्र बदलण्याचा सरकारचा विचार

Mango Flowering: आंबा पिकाने धरला बहर

Animal Nutrition: पशुआहारातील स्टार्चचे महत्त्व

Agriculture Electricity: खंडित वीजपुरवठ्याने शेतकरी मेटाकुटीस

SCROLL FOR NEXT