Government Considers Changing LPG Cylinder Subsidy Formula: केंद्र सरकारचा देशातील घरगुती गॅस सिलिंडरवरील अनुदानात मोठा बदल करण्याचा विचार आहे. गेल्या महिन्यात सरकारी तेल कंपन्यांनी अमेरिकन निर्यातदारांसोबत वार्षिक पुरवठा करार केला. त्यानंतर आता सरकार एलपीजी अनुदान सूत्रात बदल करण्याचा विचार करत असल्याचे समजते..सध्याचे अनुदान हे पश्चिम आशियातील एलपीजी पुरवठ्यासाठीचा बेंचमार्क, सौदी करार दराच्या (Saudi Contract Price) आधारे निश्चित करण्यात आले होते. दरम्यान, आता सरकारी तेल कंपन्यांनी अमेरिकेतील बेंचमार्क दराचा आणि अमेरिकेतून अटलांटिक महासागर ओलांडून होणाऱ्या अधिक मालवाहतूक खर्चही त्यात गृहित धरण्याची विनंती केली आहे..जेव्हा सौदी करार दराच्या तुलनेत दरात मिळणारी सवलत वाहतूक खर्च भरून काढण्याएवढी मोठी असेल; तेव्हाच अमेरिकेतून येणारा एलपीजी भारतासाठी परवडतो. कारण सौदी अरेबियातून होत असलेल्या पुरवठ्याच्या तुलनेत अमेरिकेतून येणाऱ्या एलपीजीचा वाहतूक खर्च जवळपास चारपट आहे..Gas Cylinder Test: घरातील गॅस सिलेंडरची वैधता कशी ओळखाल; शिका १ मिनिटात! .गेल्या महिन्यात, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम आदी कंपन्यांनी २०२६ वर्षात अमेरिकेतून सुमारे २२ लाख मेट्रिक टन प्रतिवर्ष एलपीजी आयातीसाठी एक वर्षाचा करार केला. हे प्रमाण भारताच्या वार्षिक एलपीजी आयातीच्या जवळपास १० टक्के एवढे आहे. यापूर्वी भारतीय कंपन्यांनी स्पॉट मार्केटमध्ये अमेरिकेच्या एलपीजीची खरेदी केला होता. पण अमेरिकेतून एलपीजीचा पुरवठा करण्यासाठीचा पहिलाच मुदत करार आहे..Free Gas Cylinder: मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत मोफत गॅस सिलेंडरसाठी कोणत्या महिला पात्र? .सरकारी कंपन्या घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर किती दरात पुरवठा करतात?, यावर सरकारचे नियंत्रण असते. जेव्हा बाजारातील दरापेक्षा कमी दराने जेव्हा एलपीजीचा पुरवठा केला जातो; तेव्हा कंपन्यांना तोटा सहन करावा लागतो. तेव्हा त्यांना याबाबतची भरपाई सरकारकडून दिली जाते. आता, नवीन सूत्रामुळे अनुदानाचे गणित बदलू शकते..सध्या दिल्लीत १४.२ किलो वजनाच्या एलपीजी सिलिंडरची किंमत ८४३ रुपये आहे. तर महाराष्ट्रातील काही भागात हा दर ८६७ रुपये आहे. यात याआधी ८ एप्रिल २०२५ रोजी शेवटचा बदल करण्यात आला होता. त्यावेळी घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात ५० रुपये वाढ केली होती. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना ३०० रुपये अनुदान मिळते. सध्या देशात उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या सुमारे १० कोटी आहे. तर देशात एकूण एलपीजीचा वापर करणाऱ्यांची एकूण संख्या सुमारे ३३ कोटी आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.