Weather Update : तापमान वाढ कायम राहण्याचा अंदाज

राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरू आहेत. किमान तापमान ११ अंशांच्या वर गेल्याने गारठा कमी झाला आहे.
Weather Update
Weather UpdateAgrowon
Published on
Updated on

पुणे : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरू आहेत. किमान तापमान (Minimum Temprature) ११ अंशांच्या वर गेल्याने गारठा कमी झाला आहे. यातच उन्हाचा चटका, कमाल तापमान कायम असल्याने दुपारच्या वेळी काहीसा उकाडा जाणवत आहे. आज (ता. १) राज्यात कोरड्या हवामानासह, तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Weather Update
Hawaman Andaj : उन्हाचा चटका, उकाडा कायम राहण्याचा अंदाज | ॲग्रोवन

उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांच्या अभाव, किमान तापमानात झालेली वाढ, यामुळे राज्यात गारठा कमी झाला आहे. उन्हाचा चटका कायम असून, कमाल तापमान स्थिर आहे. उत्तरेकडील राज्यांमध्येही थंडी कमी-अधिक होत आहे. राजस्थानातील चुरू येथे बुधवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी ५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.  

बुधवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील निफाड येथील गहू संशोधन केंद्र व धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ११ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी कमाल ३३.८ अंश तापमान नोंदले गेले. उर्वरित राज्यात किमान तापमानातील वाढ कायम असून, बहुतांशी ठिकाणी पारा ११ ते २३ अंशांच्या दरम्यान आहे. तर कमाल तापमान २८ ते ३४ अंश सेल्सिअसच्या आसपास कायम आहे.

Weather Update
Tur Market: देशात तुरीची टंचाई कायम राहण्याचा अंदाज |ॲग्रोवन


बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे संकेत
बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमान समुद्राजवळ रविवारपर्यंत (ता. ४) चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे या भागात सोमवारपर्यंत (ता. ५) कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.


बुधवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३२.३ (१४.३), जळगाव ३१.५ (१४.५), धुळे ३१ (११.०), कोल्हापूर ३०.५ (१९.२), महाबळेश्‍वर २७.५ (१४.६), नाशिक ३१.१ (१५.२), निफाड ३१ (११.०), सांगली ३१.२ (१८.२), सातारा २९.६ (१९.३), सोलापूर ३३.८ (१५.८), सांताक्रूझ ३१.८(२०.२), डहाणू २९.८ (१९.४), रत्नागिरी ३२ (२१.७), औरंगाबाद ३१.३ (१२), नांदेड ३०.८ (१४), उस्मानाबाद - (१५), परभणी ३१.२ (१२.६), अकोला ३१.९ (१४.२), अमरावती ३१ (१३.६), बुलडाणा ३० (१४.५), ब्रह्मपुरी ३१.४ (१४.५), चंद्रपूर २८.२ (१४.२), गडचिरोली २९.४ (१२.८), गोंदिया ३० (१२.६), नागपूर ३० (१२.६), वर्धा ३० (१३), यवतमाळ ३२ (१२).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com