डॉ. लिंबाजी साळवेAnimal Care: पशू आहारात जास्त स्टार्च दिले गेले तर ॲसिडोसिस, दुधातील फॅट कमी होणे आणि जुलाब अशी लक्षणे दिसतात. स्टार्च वाढवताना बफर, तंतुमय चारा वाढवणे गरजेचे असते. महाराष्ट्रातील हवामान, चारा-उपलब्धता, परंपरागत आहार पद्धत लक्षात घेऊन दूध देणाऱ्या गायीच्या वेताच्या टप्प्यानुसार आहारातील स्टार्च किती टक्के किती असावे याचा पशुपालकाला अभ्यास असणे महत्त्वाचे आहे..रुमेनमध्ये स्टार्चचे व्हीएफए(प्रोपिओनेट) मध्ये रूपांतर होते. प्रोपिओनेटपासून ग्लुकोज तयार होतो.ग्लुकोजपासून दुधातील लॅक्टोज तयार होते.लॅक्टोज वाढल्याने दूध उत्पादन वाढते.स्टार्च = ऊर्जा, रुमेन मधील सामू आणि दुधातील फॅट यांचा समतोल साधणे तितकेच महत्त्वाचे आहे..स्टार्चचे मुख्य स्तोत्रमका ः सुरक्षित, हळू पचणारा घटकज्वारी / बाजरी ः मध्यम पचन क्षमतागहू / बार्ली ः वेगाने पचणारे (मर्यादित प्रमाणातच वापरावे)पशुखाद्य ः प्रक्रिया केलेले सुरक्षित स्टार्च समाविष्ट असते.टी एम आर ः पूर्ण संतुलित स्टार्च आणि इतर सर्व अन्नघटक.Animal Health: निकृष्ट मुरघासाचा जनावरांच्या आरोग्यावर होतोय परिणाम .स्टार्च घटक वापरतानाजास्त स्टार्च दिले गेले तर ॲसिडोसिस, दुधातील फॅट कमी होणे आणि जुलाब अशी लक्षणे दिसतात.स्टार्च वाढवताना बफर, तंतुमय चारा (कडबा, मका सायलेज, हिरवा चारा, पीएमआर ) वाढवणे गरजेचे असते.दुधातील फॅट जर ३.५ टक्यांपेक्षा कमी लागत असेल तर कदाचित आहारातील स्टार्च जास्त असण्याची शक्यता असू शकते.गायीचे शेण पातळ येत असेल तर आहारातील स्टार्च कदाचित जास्त झालेले असावे..महाराष्ट्रात एनडीडीबीनुसार, स्टार्चसोबत एसडीएफ २८ ते ३२ टक्के ठेवावा जेणेकरून ॲसिडोसिस टाळला जाऊ शकतो.ज्वारी, गहू, मका सारखे यासारखे स्थानिक धान्य वापरताना त्यास बुरशी अथवा आरोग्यास हानिकारक घटक नाहीत ना याची खात्री करावी. दूध उत्पादनानुसार उच्च गुणवत्तेची पशुखाद्य उत्पादने जनावरांच्या आहारात वापरावीत. गरजेनुसार खनिज मिश्रण १२० ते १५० ग्रॅम नियमित द्यावे..Animal Husbandry: पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा.वेताच्या टप्यानुसार स्टार्च वापराचे प्रमाणवेताचा टप्पा कालावधी स्टार्च (टक्के) महत्त्वाच्या सूचनाफार-ऑफ वेतापूर्वी ६० दिवस १० ते १४ कमी स्टार्च, जास्त तंतुमय चारा (कडबा, गवत, पी एम आर)क्लोज-अप वेतापूर्वी शेवटचे २१ दिवस १२ ते १६ पचनसंस्थेची तयारी, अॅसिडोसिस टाळानवीन वेत झालेली गाय १ - २१ दिवस १६ ते २० हळूहळू स्टार्च वाढवा, खाण्याची क्षमता कमी असते..वेताच्या सुरुवातीचाकालावधी २१ ते १०० दिवस २२ ते २६ जास्त दूध उत्पादनासाठी जास्त ऊर्जा आवश्यक असते.वेताच्या मध्याचाकालावधी १०० ते २०० दिवस २२ ते २५ दूध टिकवणे + शरीरस्थिती संतुलन महत्त्वाचे.वेताच्या शेवटचाकालावधी २०० दिवसा नंतर १८ ते २२ जादा चरबी वाढू नये म्हणून स्टार्च कमी ठेवावे.जास्त दूध देणाऱ्या गायी चांगले व्यवस्थापन २६ ते २८ (कमाल) टी एम आर वापरावे.- डॉ. लिंबाजी साळवे ८३९०५८३९९९ ( लेखक पशू आहार तज्ज्ञ आहेत).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.