Pomegranate Production agrowon
ताज्या बातम्या

Pomegranate Production : राज्यात डाळिंब उत्पादन ७० टक्के घटण्याची शक्यता

उत्पादक मेटाकुटीला; मृग बहर सलग चौथ्या वर्षी अडचणीत

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

सांगली ः राज्यातील मृग बहरातील डाळिंब बागांना (Pomogranate) सलग चौथ्या वर्षी अतिवृष्टी (Heavy Rainfall) आणि परतीच्या पावसाने अडचणीत आणले आहे. पावसामुळे कुजवा, तेलकट रोगाचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी, डाळिंबांचे सुमारे ७० टक्के उत्पादन घटण्याची शक्यता डाळिंब उत्पादन संघाने व्यक्त केली आहे.

१० हजार हेक्टरवर ७५ टक्के नुकसान सध्या १० हजार हेक्टरवरील डाळिंब बागांचे ७५ टक्के नुकसान झाले असल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे.पान ४ वर डाळिंबाला घातलेला खर्चही मिळणे मुश्कील बनले आहे.https://www.youtube.com/watch?v=FC0yNVkREq8

राज्यात सर्वाधिक डाळिंबाचा मृग बहर धरला जातो. परंतु गेल्या तीन वर्षांपासून अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे या बहरावर पाणी फेरले आहे. परिणामी, दरवर्षी या बहरातील क्षेत्रातही मोठी घट होत असल्याचे चित्र आहे. या वर्षी राज्यात डाळिंबाचा मृग बहर सुमारे ३० हजार हेक्टरवर धरला आहे. गेल्या महिन्यात देखील राज्यातील डाळिंब उत्पादन घेणाऱ्या जिल्ह्यात पाऊस झाला. परंतु त्या वेळी फारसा फटका सुरुवातीच्या टप्प्यात बसला नाही.

दरम्यान, डाळिंबाचे फळ पेरुच्या आकाराचे होते. परंतु तेलकट रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत होता. डाळिंब पिकाला पोषक असे वातारवण नसल्याने फुलांचे सेटिंग झाले नाही. त्यातच डाळिंबाचा आकार काहीसा वाढला नाही. ३० हजार हेक्टरपैकी १० हजार हेक्टरवरील बागांचे गेल्या महिन्यात नुकसान झाले.

सध्या डाळिंबाची काढणी सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी विक्रीही सुरू झाली आहे. डाळिंबाला प्रति किलोस १०० रुपयांपासून ते १५० रुपये असा दर मिळत आहे. मात्र ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दिवसापासून राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. तर बहुतांश भागात सतत पाऊस सुरू आहे. पाणी शेतांत साचून आहे. परिणामी, डाळिंबावर तेलकट रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. फळकुजदेखील होऊ लागली आहे. त्यामुळे उत्पादकांच्या मागे संकटाची मालिकाच लागली आहे.

कार्यपालनाचा अहवाल लवकर पाठवा

एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या माध्यमातून कीड व रोग नियंत्रण करा, असा सल्ला शेतकऱ्यांना विकल्या जाणाऱ्या कीडनाशकांच्या उत्पादनांवर नमुद करावा. याबाबत कार्यपालन केल्याचा अहवाल आम्हाला लवकरात लवकर पाठवा, असेही केंद्राने राज्याला कळवले आहे.

जनजागृती, प्रशिक्षणाच्या सूचना

केंद्राच्या या सूचनेनंतर राजाच्या कृषी खात्याचे अवर सचिव प्रशांत पिंपळे यांनी कृषी आयुक्त धीरज कुमार यांना पत्र लिहिले आहे. “शेतीमालामध्ये कीडनाशकांचे कमाल मर्यादा अंश मर्यादेपेक्षा जास्त आढळत असल्याचे केंद्राने कळविले आहे. त्यामुळे तुम्ही उपाय करून त्याचा कार्यपालन अहवाल थेट केंद्राकडे पाठवावा,” असे या पत्रात म्हटले आहे.

या पत्रानंतर कृषी आयुक्तालयातील गुणनियंत्रण संचालक दिलीप झेंडे यांनी राज्यभर एक आदेश जारी करीत कीडनाशकांच्या वापराबाबत जनजागृती व प्रशिक्षण उपक्रम हाती घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing 2025: देशात खरीप पेरणीला वेग; कापूस, सोयाबीन, तूर पिछाडीवर

ZP School Admission : झेडपी शाळेत प्रवेश घेतल्यास होणार कर माफ

Free Sand Policy : घरकुल लाभार्थ्यांना चार टक्केच वाळूचा पुरवठा

Crab Farming : बंदीस्त खेकडा पालन करण्यासाठी प्रोत्साहन

Livestock Support: पशुपालकांना आता मिळणार शेतीसारख्या सवलती; ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना

SCROLL FOR NEXT