Kharif Sowing Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Sowing : बारामती तालुक्यात १७ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन

Kharif Season Update : चालू वर्षी खरीप हंगामात बारामती तालुक्यात १७ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन आहे. त्यासाठी कृषी विभागाने पूर्ण तयारी केली आहे.

Team Agrowon

Baramati News : ‘‘चालू वर्षी खरीप हंगामात बारामती तालुक्यात १७ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन आहे. त्यासाठी कृषी विभागाने पूर्ण तयारी केली आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशके मुबलक उपलब्ध आहेत,’’ अशी माहिती तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांनी दिली.

बारामती तालुक्यात बाजरी, सोयाबीन, मका ही खरिपातील महत्त्वाची पिके आहेत. मूग, तूर, उडीद, सूर्यफूल ही कडधान्याची पिके देखील घेतली जातात. हंगामात बाजरीचे ९ हजार हेक्टर क्षेत्र आहे.

बारामती तालुक्यात मक्याचे पाच हजार हेक्टर, तर दोन हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली जाते. खरिपातील आडसाली उसाचे क्षेत्र ११ हजार ५०० हेक्टर आहे. तालुक्यात कपाशी लागवडीचा प्रयोगदेखील शेतकरी करीत आहेत. गत हंगामात २०० हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती.

भरारी पथकाची नेमणूक

खरीप हंगामात बियाणे व खते खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास विक्रेता व कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी

भरारी पथकाची नेमणूक केली आहे. पंचायत समिती कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व मंडल अधिकाऱ्यांचा समितीमध्ये समावेश आहे. फसवणूक झाल्यास शेतकऱ्यांनी तक्रार नोंदविणे गरजेचे आहे.

ज्वारीचे क्षेत्र निम्म्याने घटले

बारामती तालुक्यात रब्बी हंगामातील ज्वारीचे क्षेत्र कमी होत आहे. तालुक्यात ४४ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीचे पीक घेतले जात होते. मात्र त्यात घट होऊन २२ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची लागवड होताना दिसत आहे. ज्वारीचे क्षेत्र निम्म्याने घटले आहे. बाजरीबाबत देखील हीच परिस्थिती आहे.

जून महिना जवळ येत असल्याने खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे. बियाणे, खतांची कमतरता भासणार नाही. शेतकऱ्यांनी निविष्ठा खरेदी करताना पक्के बिल घेऊन ते जतन करावे. जेणेकरून, फसवणूक झाल्यास तक्रार नोंदवता येईल. नुकसान भरपाई मिळण्यास मदत होईल.
- सुप्रिया बांदल, तालुका कृषी अधिकारी, बारामती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation: १९ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा; मार्चमधील अवकाळीच्या नुकसानीपोटी १६४ कोटी मदत मंजूर

Summer Moong Sowing: खानदेशात उन्हाळ मूग पेरणीला प्रतिसाद

Sugar Export Ban: साखर निर्यात बंदी म्‍हणजे शेतकऱ्यांची लूट : अशोकराव थोरात

Swachhta Hi Seva Campaign: ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाचा ५०० वा टप्पा साजरा

Villages Flood Risk: अहिल्यानगर जिल्ह्यातील २२३ गावे पुराच्या धोक्यात

SCROLL FOR NEXT