Kharif Sowing: पेरणीसाठी घरचे बियाणे वापरताना काय काळजी घ्यावी?

Team Agrowon

बियाण्याची उपलब्धता

खरीप हंगामात पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना बियाण्याची उपलब्धता आणि बोगस बियाणे संकटाला सामोरे जावे लागते. त्यामुळे बरेचसे शेतकरी घरचेच बियाणे पेरणीसाठी वापरण्याला प्राधान्य देतात. मात्र बियाणे व्यवस्थित न साठवल्यामुळे बियाण्याची उगवणक्षमता कमी झालेली असते.

Kharif Sowing | Agrowon

बियाण्याची उगवण क्षमता

अलीकडे काढणी व मळणीच्या अवस्थेत पीक पावसात सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. बियाणे पावसात भिजल्यामुळे बियाण्याची उगवण क्षमता अत्यंत कमी होते. 

Kharif Sowing | Agrowon

पेरणीसाठी वापरताना खबरदारी बाळगणे

घरगुती बियाणे जतन करणे आणि तेच बियाणे पेरणीसाठी वापरताना खबरदारी बाळगणे आवश्यक असते. यामध्ये पुढील उपाययोजनांचा समावेश होतो.

Kharif Sowing | Agrowon

दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण

साठवणूक करताना दाण्यात ओलाव्याचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त नसावे. बियाणे साठवणूक करतेवेळी लाकडी फळ्या टाकून त्यावर पोते ठेवावे. जेणेकरुन खालची ओल बियाण्याला लागणार नाही व बियाणे खराब होणार नाही. 

Kharif Sowing | Agrowon

बियाण्याची साठवणूक

बियाण्याची साठवणूक करताना जास्तीत जास्त ५ पोत्याची थप्पी मारावी त्यापेक्षा जास्त उंच थप्पी लावल्यास तळाच्या पोत्यातील बियाण्याची डाळ होऊन उगवणशक्ती कमी होण्याची शक्यता असते. 

Kharif Sowing | Agrowon

बियाण्याची उगवणशक्ती

बियाणे पोत्यात साठवताना चारही बाजूने हवा खेळती राहील अशा रीतीने ठेवावे अन्यथा गोदामाच्या आत  गरम जागा तयार होईल. त्यामुळे बियाण्याची उगवणशक्ती खूप लवकर कमी होते. 

Kharif Sowing | Agrowon

बियाण्यातील आर्द्रता

बियाणे साठवणूक करण्याचे ठिकाण थंड ठेवण्याचा प्रयत्न करावा पण त्यासाठी कुलरचा वापर करु नये अन्यथा बियाण्याची आर्द्रता वाढेल त्यामुळे बियाणे खराब होऊ शकते. 

Kharif Sowing | Agrowon

किडनाशकाची फवारणी

आवश्यकतेनूसार भांडाराची साफसफाई व आवश्यकता पडल्यास किडनाशकाची फवारणी करावी. जेणेकरुन बियाण्यावर कीड रोगाचा प्रादुर्भाव टाळता येईल. पेरणीपुर्वी बियाण्याची उगवणक्षमता तपासूनच पेरणी करावी.  

Kharif Sowing | Agrowon
PM Kisan | Agrowon