Crop Sowing
Crop Sowing Agrowon
ताज्या बातम्या

Rabi Sowing : दोन लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन

टीम ॲग्रोवन

परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदाच्या (२०२२-२३) रब्बी हंगामात (Rabi Season) २ लाख ७८ हजार ३९७ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. विविध पिकांच्या ५३ हजार ३७३ क्विंटल बियाणे मागणी करण्यात आली आहे. रब्बीसाठी विविध ग्रेडच्या रासायनिक खतांचा १ लाख ४ हजार १०० टन साठा मंजूर आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या (Agricultural Department) सूत्रांनी दिली.

परभणी जिल्ह्यात रब्बी हंगामातील सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर आहे.विविध रब्बी पिकांच्या बियाण्याची विक्री २०१९ मध्ये ४८ हजार ६०७ क्विंटल, २०२२ मध्ये ४४ हजार २१ क्विंटल, २०२१ मध्ये ५२ हजार ९४४ क्विंटल झाली होती.

या पाच वर्षात सरासरी ४८ हजार ५२४ क्विंटल बियाण्याची विक्री झाली. गतवर्षीप्रमाणेच यंदा अनेक भागात सिंचनासाठी पाणी उपलब्ध असल्यामुळे रब्बीच्या क्षेत्रात सरासरीच्या तुलनेत वाढ होण्याची शक्यता आहे.

विशेषतः हरभरा, गहू या पिकांच्या क्षेत्रात यंदा वाढ होऊ शकते. परंतु ज्वारी, करडई आदी पिकांचे क्षेत्र कमी राहण्याचा अंदाज आहे. यंदाच्या प्रस्तावित पेरणी क्षेत्रानुसार एकूण ५३ हजार ३७३ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यात महाबीजकडे २६ हजार ५६ क्विंटल आणि खासगी कंपन्यांकडे २७ हजार ३१७ क्विंटल बियाण्याचा समावेश आहे.

१ लाख ४ हजारावर टन खतसाठा मंजूर

यंदाच्या रब्बी हंगामात ऑक्टोंबर ते मार्च या कालावधीसाठी विविध ग्रेडच १ लाख ४ हजार १० टन रासायनिक खतसाठा मंजूर आहे. महिना मंजूर खतसाठा उपलब्ध होईल. त्यात युरिया३६ हजार ८०० टन, डिएपी २१ हजार २०० टन, पोटॅश ७ हजार टन, संयुक्त खते (एनपीके) २९ हजार टन, सिंगल सुपर फॉस्फेट ९ हजार ८०० टन, इतर ३०० टन खतांचा समावेश आहे.

रब्बी पेरणी प्रस्तावित क्षेत्र(हेक्टरमध्ये), बियाणे मागणी (क्विंटलमध्ये)

पीक सर्वसाधारण क्षेत्र प्रस्तावित क्षेत्र बियाणे मागणी

ज्वारी १५९०७८ ९९९४० १८९८

गहू ३०४७६ ३७३८६ १४९५४

मका ९०० १६२८ २४४

हरभरा ५३०६४ १३७९०६ ३६२००

करडई २५२०९ १११६ ५०

सूर्यफूल ४७९८ २३.३५ १

इतर पिके ३८४२ ३९८ २६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT