MIllet Sowing  Agrowon
ताज्या बातम्या

Bajari Sowing Completed : खानदेशात बाजरीची पेरणी पूर्ण

खानदेशात बाजरीची पेरणी काही भागांचा अपवाद वगळता पूर्ण झाली आहे. सुमारे साडेपाच हजार हेक्टरवर एकूण पेरणी आहे.

Team Agrowon

MIllet Sowing जळगाव ः खानदेशात बाजरीची पेरणी (Pearl Millet Sowing) काही भागांचा अपवाद वगळता पूर्ण झाली आहे. सुमारे साडेपाच हजार हेक्टरवर एकूण पेरणी आहे. जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक तीन हजार हेक्टरवर पेरणी (Bajari Sowing) झाल्याचा अंदाज आहे.

कृषी यंत्रणांकडून पेरणीबाबत सर्वेक्षण सुरूच आहे. परंतु कृषी केंद्रचालकांकडील बाजरी बियाण्याची विक्री व शेतकऱ्यांचा कल यानुसार पेरणी साडेपाच हजार हेक्टरवर पोचल्याचा अंदाज आहे.

बाजरी पेरणीसाठी शेतकऱ्यांनी यंदा पक्ष्यांपासून संरक्षण देणाऱ्या वाणांना पसंती दिली आहे. तसेच कमी कालावधीत आणि मध्यम, हलक्या जमिनीत चांगले उत्पादन देणाऱ्या वाणांचीदेखील मागणी होती.

काही शेतकरी हरभऱ्याचे पीक घेऊन रिकाम्या झालेल्या क्षेत्रात बाजरीची पेरणी करीत आहेत. सुरुवातीला किंवा खरिपात मका किंवा सोयाबीन, उडीद, मूग, त्यानंतर रब्बीत आगाप किंवा कोरडवाहू क्षेत्रातील देशी हरभरा आणि आता उन्हाळ हंगामासंबंधी बाजरी संबंधित शेतकरी पेरत आहेत.

बाजरीची पेरणी सरतेशेवटी सहा ते साडेसहा हजार हेक्टरवर पोहोचू शकते, असाही अंदाज आहे. कारण अनेक शेतकरी फेब्रुवारीच्या मध्यातही किंवा उष्णता जाणवू लागताच पेरणी करतात. बाजरीचे बियाणेही बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. त्याच्या दरातही किंचित किंवा जुजबी वाढ झाली आहे.

शिरपूर, चोपडा, जामनेर भागात अनेकांनी बेवडसाठी बाजरीची पेरणी केली आहे. कारण बाजरीचे बेवड केळी, कापूस व इतर पिकांसाठी लाभदायी मानले जाते. तसेच बाजरीचे दरही मागील दोन - तीन हंगाम टिकून आहेत. कोविड काळातही बाजरीला किमान १७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला होता.

मागील हंगामात कमाल दर २३०० रुपये प्रतिक्विंटल, असा होता. सध्या बाजारात बाजरीचे दर २४०० रुपये प्रतिक्विंटलवर आहेत. पुढे दरात आणखी वाढ होवू शकते, असाही अंदाज आहे. एकरी आठ ते १० क्विंटल बाजरीचे उत्पादन अनेक शेतकरी ठिबक सिंचनाद्वारे सिंचन व काटेकोर खत व्यवस्थापन करून करतात.

मका पिकाच्या तुलनेत कमी कालावधी व कमी खर्चात बाजरीचे पीक हाती येते. यामुळेदेखील काळ्या कसदार जमिनीच्या पट्ट्यात शेतकऱ्यांनी बाजरी पेरणीस पसंती दिली आहे.

 ...या भागात पेरणी

जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, भडगाव, पारोळा, पाचोरा, अमळनेर, चोपडा, जामनेर, जळगाव या भागांत बऱ्यापैकी पेरणी आहे. धुळ्यातील साक्री, शिंदखेडा, धुळे व शिरपूर या सर्वच तालुक्यांत पेरणी अपेक्षेप्रमाणे झाली आहे.

नंदुरबारातही नंदुरबार, नवापूर, तळोदा व शहादा भागांत बाजरी पेरणी झाली आहे. पेरणी जानेवारीच्या मध्यातच झाली. काहींनी मागील दोन- तीन दिवसांत पेरणीला वेग दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT