Raisin Rate  Agrowon
ताज्या बातम्या

Bedana Payment : बेदाण्याचे पेमेंट एकवीस दिवसांत मिळणार

Raisin Market Update : बेदाण्याचे पेमेंट २१ दिवसांत न दिल्यास २ टक्के व्याज व्यापारी देणार, बेदाणा बॉक्सचे निम्मे पैसे देण्याची तयारी आणि ५०० ग्रॅमहून अधिक तूट धरणाऱ्या व्यापाऱ्यांवर सौद्यात भाग घेण्यास बंदी घालण्याचा निर्णय झाला.

Team Agrowon

Sangli News : बेदाण्याचे पेमेंट २१ दिवसांत न दिल्यास २ टक्के व्याज व्यापारी देणार, बेदाणा बॉक्सचे निम्मे पैसे देण्याची तयारी आणि ५०० ग्रॅमहून अधिक तूट धरणाऱ्या व्यापाऱ्यांवर सौद्यात भाग घेण्यास बंदी घालण्याचा निर्णय झाला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्या मोर्चाची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सांगली बाजार समितीत सोमवारी (ता. २२) दुपारी पाच वाजता बैठक झाली.

या वेळी जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, सचिव महेश चव्हाण, चंद्रकांत सूर्यवंशी, संचालक, प्रशांत पाटील-मजलेकर, बेदाणा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र कुंभार, अशोक बाफना, मनोज मालू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे उपस्थित होते.

महेश खराडे म्हणाले, की व्यापारी शेतकऱ्यांना दोन टक्के व्याजाने पैसे देतात, मात्र बेदाण्याचे पेमेंट दोन-दोन महिने देत नाहीत. त्यामुळे २१ दिवसांपेक्षा उशिरा पेमेंट दिल्यास दोन टक्के व्याज लावून पेमेंट करावे. सर्व बारदाण्यांचे निम्मे पैसे शेतकऱ्यांना मिळतात, मग बॉक्सचे निम्मे पैसे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे.

५०० ग्रॅमहून अधिक तूट धरल्यास संबंधित अडत दुकानदारांवर कारवाई करावी, स्टोअरेजमध्ये जेवढे दिवस बेदाणा ठेवला तेवढेच भाडे आकारले जावे, बेदाणा दर पडणार नाही याची दक्षता घ्यावी, द्राक्ष दलालांची नोंदणी बाजार समितीने करावी, अशा मागण्या करण्यात आल्या.

संचालक प्रशांत पाटील म्हणाले, की ५०० ग्रॅमहून अधिक तूट यापुढे धरली जाणार नाही. ती तपासणी पथकामार्फत केली जाईल. त्यात चुकीचे आढळल्यास किंवा शेतकऱ्यांची तशी तक्रार आल्यास संबंधित अडत दुकानदाराला सौद्यात भाग घेण्यास बंदी घातली जाईल, असे सांगितले.

उपनिबंधक सुरवसे यांनी सर्व बाबींची तपासणी करण्यासाठी पुन्हा महिन्याने बैठक घेऊन या या निर्णयाची अंमलबजावणी होते की नाही, हे पाहू असे स्पष्ट केले. या वेळी व्यापारी, प्रशासनाने अधिकारी उपस्थित होते.

पंढरपूर, सोलापूर, विजापुरातही निर्णय व्हावा

बेदाणा पेमेंट उशिरा देणे चुकीचे आहे. त्यामुळे ३० दिवसांपेक्षा उशिरा पेमेंट दिल्यास २ टक्के व्याज देण्याची तयारी आहे. राजेंद्र कुंभार यांनी बेदाणा बॉक्सबाबतीत निम्मे पैसे देण्याची तयारी आहे. मात्र हे पैसे खरेदीदार देणार आहेत.

त्यामुळे त्यांच्याशी आम्ही चर्चा करतो. केवळ सांगली आणि तासगाव पुरताच हा निर्णय झाल्यास खरेदीदार दुसऱ्या मार्केटमध्ये खरेदीसाठी जातील. त्यामुळे पंढरपूर, सोलापूर आणि विजापूर येथेही हा निर्णय व्हावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Wildlife Conservation: दोन राखीव वनक्षेत्रांसह १४ संवर्धन राखीव क्षेत्रांना मान्यता; गडचिरोलीत रानम्हशींसाठी स्वतंत्र अभयारण्य

Farmer Death: फायनान्सच्या कर्जवसुलीच्या तगाद्याने तरुणाची आत्महत्या

Farmer Harassment: शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास दिल्यास थेट फौजदारी गुन्हा; फडणवीसांचे निर्देश

Panand Road Scheme: शेत-पाणंद रस्ते योजनेत मोठा बदल! खर्च मर्यादेत सुधारणा करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय

Duty-Free Cotton Imports: कापूस आयातीला मुदतवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT