Sugarcane Bill Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Bill : ऊसबिले द्या, अन्यथा गाळप परवाना रद्द

Sugarcane Season : साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत गुलकुंडवार यांनी कारखान्याला तंबी देत ऊस बिले अदा करा अन्यथा गळीत हंगामास परवानगी देणार नसल्याचे सांगितले.

Team Agrowon

Solapur News : गळीत हंगाम पूर्ण होऊन ७ ते ८ महिने झाले तरी करमाळा तालुक्यातील मकाई व कमलाई या दोन कारखान्यांनी शेतकऱ्यांची बिले अद्याप अदा केली नाहीत, या कारखान्यांच्या विरोधात जनशक्ती संघटनेने पुणे येथील साखर संकुल येथे आंदोलन केले. साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत गुलकुंडवार यांनी कारखान्याला तंबी देत ऊस बिले अदा करा अन्यथा गळीत हंगामास परवानगी देणार नसल्याचे सांगितले.

तर येत्या ७ दिवसात आंदोलन शेतकऱ्यांची ५० टक्के रक्कम अदा करून येत्या ३० तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांची १०० टक्के बिले आधार करण्यात येतील असे आश्‍वासन मकाई व कमलाई या दोन कारखान्यांकडून देण्यात असल्याची माहिती जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांची बिले मिळत नसल्याने अतुल खूपसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनशक्ती शेतकरी संघटनेने सकाळी सात वाजता साखर संकुल कार्यालयात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला. परंतु कार्यकर्त्यांनी शांत न राहता गर्दीचा वाढता दबाव पाहता भीक मागो आंदोलन करून साखर आयुक्त कार्यालयाच्या गेटवर ठिय्या मारला.

यावेळी यावर तोडगा काढत आंदोलक शेतकऱ्यांची ५० टक्के बिले येत्या सात दिवसात अदा करण्याचे आश्वासन दिले तर सर्वच्या सर्व बिले ३० सप्टेंबरच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील असे कारखानदारांकडून आश्वासित करण्यात आले.

यावेळी विनिता बर्फे, शर्मिला नलवडे, गणेश वायभासे, राणा वाघमारे, अनिल शेळके, अतुल राऊत, शरद एकाड, बिभीषण शिरसाट, दीपाली डिर उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agripreneurship MOU: कृषी विद्यापीठ, सह्याद्री फार्म्समध्ये करार

Jalalakshmi Irrigation Scheme: जललक्ष्मी प्रवाही योजनेचा २३ गावांतील शेतीला लाभ

Tiger Attack Compensation: सोनवणे कुटुंबाला १० लाखांचा धनादेश

Solapur Development Projects: वारी, कॉरिडॉर, आयटी पार्कला ‘टॉप प्रायोरिटी’

Sugarcane Payments Pending: उसाचे पेमेंट न मिळाल्याने शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

SCROLL FOR NEXT