Dimbhe Dam Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Irrigation : ‘डिंभे’ची पाणीपट्टी भरून हक्क शाबूत ठेवा

Latest Agriculture News : हुतात्मा बाबू गेनू जलाशयातून (डिंभे धरण, ता. आंबेगाव) शेतीला मिळणाऱ्या पाण्याची बारा हजार रुपये हेक्टरची पाणीपट्टी भरली जाते.

Team Agrowon

Pune News : ‘‘हुतात्मा बाबू गेनू जलाशयातून (डिंभे धरण, ता. आंबेगाव) शेतीला मिळणाऱ्या पाण्याची बारा हजार रुपये हेक्टरची पाणीपट्टी भरली जाते. पण सिंचन मात्र त्यापेक्षा दुपटीने जास्त आहे.

आंबेगाव, जुन्नर व शिरूर तालुक्यांतील शेतकऱ्यांनी सिंचन होणाऱ्या क्षेत्राप्रमाणे पाणीपट्टी भरल्यास धरणातील पाण्यावर आपला हक्क शाबूत राहील. अन्यथा, अन्य तालुके आपले पाणी पळवू शकतात,’’ अशी भीती डिंभे धरणाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता आर. टी. पोखरकर यांनी व्यक्त केली.

मंचर (ता. आंबेगाव) येथील महात्मा गांधी विद्यालयात पुणे जिल्हा स्थापत्य अभियंता संघटनेच्या वतीने अभियंता दिन साजरा करण्यात आला. भारतरत्न मोक्षगुंडम विश्‍वेश्‍वर यांच्या प्रतिमेचे पूजन अभियंता आर. टी. पोखरकर, स्थापत्य अभियंता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यतीन कुमार हुले, सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता श्‍यामकांत निघोट यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अभियंते सर्वस्वी गणपत घोडेकर, जितेंद्र बागल, प्रमोद थेऊरकर, अमित डावरे, शिवाजी कट्टे, वसीम मोमीन, निखिल गटकळ, वैष्णवी गांजाळे, शासकीय ठेकेदार, बांधकाम साहित्याचे उत्पादन व पुरवठा प्रतिनिधी उपस्थित होते.

‘‘सर विश्‍वेश्‍वरय्या यांचे संपूर्ण जीवनचरित्र हे अभियंत्यांना सकारात्मक ऊर्जा देणारे असून, नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या साधारणत: ८५ टक्के नागरी सुविधा या अभियांत्रिकी विभागामार्फत पुरविल्या जात असल्याने अभियंत्यांची जबाबदारी मोठी आहे. बांधकाम विश्‍वप्रदर्शन लवकरच भरविण्यात येईल,’’ असे हुले यांनी सांगितले.

पोखरकर यांच्या ‘माझा सिंचन प्रवास’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. श्‍यामकांत निघोट यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. अनुराग जैद यांची खेड बाजार समितीच्या संचालकपदी निवडून आल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सुनील कड, संतोष वाव्हळ यांची भाषणे झाली. सुधीर मांदळे यांनी सूत्रसंचालन, तर रवींद्र वळसे पाटील यांनी आभार मानले.

डिंभे धरणात १३.५ टीएमसी पाणीसाठा असून, वापरासाठी १२.५ टीएमसी पाणी आहे. त्यापैकी ६.५ टीएमसी पाणी येडगाव (ता.जुन्नर) धरणात सोडले जाते. तेथून कुकडी डाव्या कालव्याद्वारे जुन्नर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा व सोलापूरच्या काही भागाला पाणी दिले जाते. उर्वरित सहा टीएमसी पाणी आंबेगाव, शिरूर व जुन्नर भागांतील शेतीसाठी दिले जाते. पण सध्या शेतकरी भरत असलेली पाणीपट्टी फक्त वीस टक्के आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ओलिताखाली येणाऱ्या क्षेत्राची नोंद पाटबंधारे खात्याकडे करून पाण्याचा हक्क अबाधित ठेवावा.

- आर. टी. पोखरकर, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, डिंभे धरण

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Natural Farming : नैसर्गिक शेतीसाठी २ हजार ४८१ कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

Dragon fruit Processing : ड्रॅगन फ्रूटपासून प्रक्रिया उत्पादने

Fish Production : सुधारित मत्स्य प्रजाती उत्पादनवाढीसाठी फायदेशीर

Eknath Shinde Resign : एकनाथ शिंदे यांच्यासह फडणवीस आणि अजित पवार यांचा राजीनामा; १४ व्या विधानसभेचा कार्यकाळही आज संपणार

Fodder Crop Cultivation : पोषक चारा उत्पादनाचे नियोजन...

SCROLL FOR NEXT