Ajit pawar Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane FRP : उसाला आणखी ५०० रुपये जादा द्या ; रयत क्रांती संघटनेची मागणी

Sugarcane Season : सातारा, सांगली, कोल्हापूर या भागांमध्ये कारखान्याच्या रिकव्हरी 12 च्या पुढे आहे. त्यांना आणखी पाचशे रुपये उसाला देणे सहज शक्य आहे. शेतकऱ्यांना यावर्षीचा उसाचा दुसरा हप्ता पाचशे रुपये प्रमाणे द्यावा अशा सूचना द्याव्या अशी मागणी रयत क्रांती संघटनेच्यावतीने करण्यात आली.

Team Agrowon

Satara News : माळेगाव सहकारी साखर कारखान्याची रिकव्हरी ११.८१ असताना प्रति टन ३४११ याप्रमाणे मागील वर्षाच्या उसाला भाव दिला आहे. राज्यातील इतर कारखान्यांनी उसाला दुसरा हप्ता पाचशे रुपये द्यावा यासाठी आपण योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी रयत क्रांती संघटनेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी (ता.१०) कऱ्हाडच्या (जि.सातारा) दौऱ्यावर असताना श्री. नलवडे यांनी त्यांच्याशी भेटून निवेदन दिले. निवेदनातील माहिती अशी, की माळेगाव सहकारी साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा अधिक दर दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. कारखाना व्यवस्थापन चांगले असेल तर रिकव्हरी कमी असली तरी कारखाने एफआरपीपेक्षा जास्तीचा दर देऊ शकतात हे माळेगाव व सोमेश्वर या कारखान्यांनी दाखवून दिले आहे.

सध्या साखरेचे भाव ३५ ते ३६ रुपयांच्या पुढे आहेत. कारखान्यांनी इथेनॉल सहवीज निर्मिती यासारखे अधिक उत्पन्न देणारे उपपदार्थ तयार केले आहेत. त्यामुळे कारखान्यांनी उसाचा दुसरा हप्ता पाचशे रुपये देता येणार आहे. माळेगाव कारखान्याची रिकव्हरी ११.८१ व सोमेश्वर कारखान्याची रिकवरी ११.९१ असताना दोन्ही कारखान्यांनी ३३५० व ३४१ एवढा उसाला भाव दिलेला आहे.

सातारा, सांगली, कोल्हापूर या भागांमध्ये कारखान्याच्या रिकव्हरी बाराच्या पुढे आहे. त्यांना आणखी पाचशे रुपये उसाला देणे सहज शक्य आहे. राज्यातील इतर कारखान्यांनी व सातारा जिल्ह्यातील कारखान्यांनी संबंधित दोन्ही कारखान्यांचा आदर्श घेऊन शेतकऱ्यांना यावर्षीचा उसाचा दुसरा हप्ता पाचशे रुपये प्रमाणे द्यावा अशा सूचना द्याव्या अशी मागणी करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate In Maharashtra : कांदा निर्यात धोरणामुळेच दर घसरले असे म्हणता येणार नाही; लोकसभेत केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

Opposition MPs Protest: विरोधी खासदारांची काळे कपडे घालून संसद परिसरात निदर्शने, लोकसभा, राज्यसभेचे कामकाज तहकूब

El Nino Update : एल निनो मार्च २०२७ पर्यंत टिकण्याची ९७ टक्के शक्यता; अमेरिकेच्या हवामान संस्थेचा अंदाज

Rainwater Harvesting: पर्जन्यजल संधारण : महत्त्व, नियोजन अन् प्रभावी व्यवस्थापन

Smart Mango Farming: ९० एकरांतील व्यवस्थापन तंत्रज्ञानामुळे झाले सुलभ

SCROLL FOR NEXT