Swabhimani Shetkari Sanghatana : साखर कारखान्यांना ४०० रूपये देण्यास भाग पाडा, 'स्वाभिमानी'ची उपमुख्यमंत्री पवारांकडे मागणी

Deputy Chief Minister Ajit Pawar : उसाला प्रतिटन ४०० रुपये जादा दर द्यावा. या मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले.
Swabhimani Shetkari Sanghatana
Swabhimani Shetkari Sanghatanaagrowon
Published on
Updated on

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माळेगांव सहकारी साखर कारखाना व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने एफआरपीपेक्षा प्रतिटन जादा ५०० रूपये जादा दर दिला. या साखर कारखान्यांनी दर देण्यास परवडते मग राज्यातील साखर कारखान्यांनी उसाला प्रतिटन ४०० रुपये जादा दर द्यावा. या मागणीचे निवेदन काल (ता.११) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले.

या निवेदनामध्ये यंदा साखरेसह उपपदार्थांना चांगला दर मिळाल्यामुळे साखर कारखान्यांकडे पैसे शिल्लक राहिले आहेत. वाढलेल्या महागाईमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

दसरा दिवाळी सणाच्या तोंडावर राज्यातील ऊस ऊत्पादकांना दिलासा देण्यासाठी साखर कारखान्यांनी दुसऱ्या हप्त्यापोटी प्रतिटन किमान ४०० रूपयाचा दुसरा हप्ता देण्याबाबत कारखानदारांना आदेश करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली.

याबरोबरच महाविकास आघाडी सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दोन टप्यातील एफआरपी देण्याचा कायदा केलेला होता. सदर कायदा बदलून पुन्हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रक्कमी एफआरपी देण्याबाबत शिंदे, फडणवीस सरकारने निर्णय घेतला मात्र अजूनही त्याचा शासन निर्णय झालेला नाही. संबधित शासन निर्णय होणेसंदर्भात तातडीने निर्णय व्हावा या मागणीचेही निवेदन देण्यात आले.

महाविकास आघाडी सरकारने महात्मा फुले कर्जमाफी जाहीर केली असून या यादीतील नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे ५० हजार रूपये कागदपत्रांची पुर्तता होऊनही मिळाले नसल्याने सदरचे अनुदान तातडीने मिळावे व २ लाखावरील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे अनुदान येणेबाकी असून सदरची फक्त घोषणाच झाली असून शासन निर्णय करणे गरजेचे आहे.

Swabhimani Shetkari Sanghatana
Ajit Pawar Kolhapur : कोल्हापुरच्या उत्तरदायित्व सभेत शेतकऱ्यांनी मागितलं 'उत्तर', अजित पवारांच्या सभेत शेतकऱ्यांची बॅनरबाजी

त्याबरोबरच राज्यातील साखर कारखान्यांमध्ये राजरोसपणे काटामारीचे प्रमाण वाढले असून राज्यातील कारखान्यांचे वजनकाटे ॲानलाईन करण्याची मागणी करण्यात आली. वरील मागण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा करत लवकरच कारखानदारांना सुचना करू असे आश्वासन दिले.

याबरोबरच ५० हजार रुपयाचे प्रलंबित अनुदान येत्या महिन्याभरात सर्वांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे सांगितले. वजन काटे ॲानलाईन करण्याबाबत मी आग्रही असून साखर कारखान्यांनी मॅनलेस वजनकाटे उभारावे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी वीज बील भरणा करण्यात आघाडीवर असल्याने तो राज्याच्या वर्गवारीमध्ये ‘अ ‘वर्गात येत असल्याने विनाकपात वीज देण्याच्या सुचना महावितरणला करू असे आश्वासन दिले.

यावेळी शिष्टमंडळात प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील, सावकर मादनाईक, वैभव कांबळे, जर्नादन पाटील, शैलेश आडके, सागर शंभुशेटे, सागर मादनाईक, आण्णा मगदूम आदि पदाधिकारी ऊपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com